नगर : सहाय्यक सहकारी वकील पुष्पा अरुण गायके यांच्या गाडीसमोर अचानक बिबट्या आला होता. त्यानंतर कुटुंबाने याची माहिती परिसरातील वस्तीवरील लोकांना फोन द्वारे दिली. ऋषीकेश गायके शिवाजी पहाटेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाल्याचे निदर्शनास आले ही खबर वाऱ्यासारखी शहरांमध्ये पसरल्यानंतर बघ्यांनी मात्र या ठिकाणी तुफान गर्दी केली होती.
गेल्या दोन महिन्यापासून बिबट्यामुळे गायके मळ्यात अत्यंत भीतीची आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्या जरी जेर बंद झाला असला तरी आणखीन एक मादी व तिचे पिल्ले या भागात आजही निदर्शनास येत असल्याचे या परिसरातील प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी बोलताना सांगितले.
जिल्हा वन अधिकारी सौ. माने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली,रेंज फॉरेस्ट ऑफिसर सुरेश राठोड, वनपाल अशोक शर्माळे, वनरक्षक विजय चेमटे व इतर वन कर्मचारी आणि प्राणीमित्र हर्षद कटारिया, कृष्णा साळवे, सचिन क्षिरसागर, नितेश पटेल, चारूदत्त जगताप यांनी बिबट्याला जेरबंद करण्यात मोठी कामगिरी बजावली. सकाळी अकरा वाजता वन विभागाची गाडी आल्यानंतर जेरबंद बिबट्याला फॉरेस्ट व्हॅन मध्ये टाकून नेण्यात आले.
हेही वाचा
रक्षकच बनला भक्षक! पोलिस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा
जय श्रीरामच्या जयघोषात आज पूर्व विदर्भात प्रचारतोफा थंडावणार
फेसबुकवरील जाहिरातीला भुलला आणि दुचाकी खरेदी पडली महागात..
Latest Marathi News नगर : अखेर ‘तो’ बिबट्या जेरबंद..! Brought to You By : Bharat Live News Media.