रक्षकच बनला भक्षक! पोलिस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : पोलिस भरतीची तयारी करणार्या तरुणीवर बलात्कार, तसेच धमकावून गर्भपात केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी पोलिस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षकाने तरुणीला धमकावून जामखेड परिसरातील रुग्णालयात गर्भपात केल्याचे तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. किरण माणिक महामुनी (वय 38, रा. नागपूर) असे गुन्हा दाखल झालेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे.
याबाबत तरुणीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार तरुणी पोलिस भरतीची तयारी करत आहे. महामुनीने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्यावर बलात्कार केला. तरुणी गर्भवती झाली. त्याने तिला नगर जिल्ह्यातील जामखेड परिसरात असलेल्या एका रुग्णालयात नेले. तेथे धमकावून गर्भपात केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.
हेही वाचा
जय श्रीरामच्या जयघोषात आज पूर्व विदर्भात प्रचारतोफा थंडावणार
फेसबुकवरील जाहिरातीला भुलला आणि दुचाकी खरेदी पडली महागात..
राहुल यांना भाजप, भाकपचे आव्हान
Latest Marathi News रक्षकच बनला भक्षक! पोलिस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा Brought to You By : Bharat Live News Media.