कोल्हापूर : म्हाकवेत अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
म्हाकवे; पुढारी वॄतसेवा : म्हाकवे (ता. कागल) येथे शनिवारी रात्री ८ वाजता अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. आनंदा पांडुरंग पाटील (वय ६६) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
बस स्थानकाहून आपल्या लुना मोटर सायकल (MH09 EA 0795) गाडीवरून रात्री आठ वाजता आपल्या घराकडे जात होते. सदाशिव पाटील यांच्या दारासमोर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते खाली कोसळले. त्यांना उपचारासाठी कोल्हापूरातील सीपीआरमध्ये दाखल केले मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघाताची वर्दी सीपीआर पोलीस चौकीत देण्यात आली आहे. ते वीज बोर्डातून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन असा परिवार आहे.
हेही वाचा :
चुकांमधून धडा घेत ‘चांद्रयान-3’ यशस्वी
कोल्हापूर : पंचगंगा साखर कारखान्याचा मोठा निर्णय; प्रतिटन ऊसाला मिळणार ३३०० रुपये दर
कोल्हापूर : श्रद्धा पाटीलची राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
The post कोल्हापूर : म्हाकवेत अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार appeared first on पुढारी.
म्हाकवे; पुढारी वॄतसेवा : म्हाकवे (ता. कागल) येथे शनिवारी रात्री ८ वाजता अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. आनंदा पांडुरंग पाटील (वय ६६) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. बस स्थानकाहून आपल्या लुना मोटर सायकल (MH09 EA 0795) गाडीवरून रात्री आठ वाजता आपल्या घराकडे जात होते. सदाशिव पाटील यांच्या दारासमोर अज्ञात वाहनाने धडक …
The post कोल्हापूर : म्हाकवेत अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार appeared first on पुढारी.