दु्र्दैवी : जलतरण तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

पुणे / येरवडा : पुढारी वृत्तसेवा : चंदननगरमधील खालसा जिम येथील जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तेरा वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. अतिक नदीम तांबोळी (वय 13, रा. लेन नंबर 6, गणेशनगर, वडगाव शेरी) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे. चंदननगर येथील संघर्ष चलसा जिममध्ये खालसा हेल्थ क्लब … The post दु्र्दैवी : जलतरण तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू appeared first on पुढारी.

दु्र्दैवी : जलतरण तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

पुणे / येरवडा : Bharat Live News Media वृत्तसेवा : चंदननगरमधील खालसा जिम येथील जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तेरा वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. अतिक नदीम तांबोळी (वय 13, रा. लेन नंबर 6, गणेशनगर, वडगाव शेरी) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे. चंदननगर येथील संघर्ष चलसा जिममध्ये खालसा हेल्थ क्लब जलतरण तलाव आहे. वडगाव शेरी येथील आनंद ऋषी विद्यालयात अतिक आठवीत होता. त्याने नुकतीच आठवीची परीक्षा दिली. काही महिन्यांपूर्वी तो पोहणे शिकला होता. यापूर्वी अतिक मित्रांसोबत जलतरण तलावात पोहण्यासाठी जात होता.
मंगळवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास अतिक वडिलांकडून शंभर रुपये घेऊन मित्रांसोबत खालसा जलतरण तलावात पोहण्यासाठी गेला होता. पोहताना अचानक तो पाण्यात बुडाला. तलावातील इतर लोकांनी आरडाओरड केल्यावर जिममधील कर्मचार्‍यांनी त्याला तातडीने बाहेर काढले. लगेचच जवळील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. जलतरण तलावातील कर्मचार्‍यांचा हलगर्जीपणा आणि जीवरक्षक उपस्थितीत नसल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा सांगितले जात आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
हेही वाचा

फेसबुकवरील जाहिरातीला भुलला आणि दुचाकी खरेदी पडली महागात..
Loksabha election | पवार कुटुंबीयातील कलगीतुरा कळसाला; प्रचाराची पातळी घसरली
Upsc Gondia News : गोंदिया- गोरेगावच्या काजल चव्हाणची युपीएससीत भरारी

Latest Marathi News दु्र्दैवी : जलतरण तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.