अयोध्येत पार पडला रामलल्लाचा सुर्यकिरण तिलक सोहळा

पुढारी ऑनलाईन डेस्क : अयोध्येत आज (दि.१७) दुपारी १२ वाजता रामलल्लाचा सूर्यतिलक विधी झाला. अभिजित मुहूर्तावर सुर्यकिरणांनी रामलल्लाच्या कपाळाला स्पर्श केला. वाल्मीकी रामायणाप्रमाणे त्रेतायुगात याचवेळी व मुहूर्तावर प्रभू श्रीरामाचा जन्म झाला होता. अयोध्येतील सूर्यतिलकप्रसंगी नऊ शुभ योग असून तीन ग्रहांची स्थिती त्रेतायुगात होती, तशीच यावेळीही आहे. दुपारी १२ वाजता सूर्यतिलक झाला. तेव्हा केदार, गजकेसरी, पारिजात, … The post अयोध्येत पार पडला रामलल्लाचा सुर्यकिरण तिलक सोहळा appeared first on पुढारी.

अयोध्येत पार पडला रामलल्लाचा सुर्यकिरण तिलक सोहळा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अयोध्येत आज (दि.१७) दुपारी १२ वाजता रामलल्लाचा सूर्यतिलक विधी झाला. अभिजित मुहूर्तावर सुर्यकिरणांनी रामलल्लाच्या कपाळाला स्पर्श केला. वाल्मीकी रामायणाप्रमाणे त्रेतायुगात याचवेळी व मुहूर्तावर प्रभू श्रीरामाचा जन्म झाला होता.
अयोध्येतील सूर्यतिलकप्रसंगी नऊ शुभ योग असून तीन ग्रहांची स्थिती त्रेतायुगात होती, तशीच यावेळीही आहे. दुपारी १२ वाजता सूर्यतिलक झाला. तेव्हा केदार, गजकेसरी, पारिजात, अमला, शुभ, वाशी, सरल, काहल आणि रवियोग घडले. या नऊ शुभ योगांत रामलल्लांचा सूर्यतिलक झाला. रामजन्मप्रसंगी सूर्य आणि शुक्र आपल्या उच्च राशीत होते; तर चंद्र स्वतःच्या राशीत उपस्थित होता. या वर्षीही योगायोगाने असेच घडत आहे. ग्रहांची ही दशा देशासाठी शुभ संकेत आहे, असे ज्योतिष तज्ज्ञांचे मत आहे.
सूर्यतिलक समारंभ आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने झाला. शिखरावर रिफ्लेक्टर यंत्रणा बसविण्यात आली होती त्याद्वारे सूर्याच्या किरणांनी प्रवास केला व गर्भगृहात रामलल्लाच्या कपाळावर पडलीत. सूर्यतिलक स्पष्टपणे दिसावा व रामलल्लालाही उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून कपाळावर चंदनाचा लेप लावण्यात आसा होता.
स्वर्णजडित पीत-गुलाबी पोशाख
रामनवमीनिमित्ता रामलल्लांना पिवळा-गुलाबी रंगाचा स्वर्णजडित पोशाख परिधान केला आहे. सोन्याच्या धाग्यांनी या पोशाखावर नक्षीकाम करण्यात आलेले आहे.
हेही वाचा : 
 
The post अयोध्येत पार पडला रामलल्लाचा सुर्यकिरण तिलक सोहळा appeared first on Bharat Live News Media.

Go to Source