
जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा
आमदार एकनाथ खडसे यांना डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याचा हस्तक छोटा शकील यांच्या नावाने धमक्या आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार एकनाथ खडसे यांना चार वेगवेगळ्या फोन क्रमांकांवरून धमकी आली आहे. यातील पहिल्यांदा फोन करणार्याने दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील हे एकनाथ खडसे यांना मारणार असल्याचे धमकावले. त्यानंतर, त्यांना अजून अन्य तीन म्हणजे एकूण चार दुरध्वनी रून धमक्या आल्याचे वृत्त आहे. यात समोरच्या व्यक्तीने “हमने-इनको मार डाला है, अब तुम छोटा शकील को मार डालो नही तो तुम्हारी खैर नही !” असे धमकावले गेले आहे. सर्व धमक्यांचे फोन हे १३५३५९५२४४; ८१९२०२५८४०; ९३७२७४७६६० आणि ९७६५०७८४४४ या क्रमांकावरून आले असून आ. एकनाथ खडसे यांनी या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यामध्ये धमकीचे फोन दि. १५ आणि १६ एप्रिल रोजी आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी अज्ञात आरोपींच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस स्थानकात भादंवि कलम ५०७ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर पुढील तपास पोलीस निरिक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक संदीप दुनगहू व हवालदार संजय पवार हे करत आहेत.
हेही वाचा:
अमेठीतून निवडणूक लढवणार? राहुल गांधी म्हणाले, “काँग्रेस अध्यक्ष…”
Dubai flood news | दुबईच्या वाळवंटात पावसाचा कहर, विमानतळ पाण्यात बुडाला, शेजारील ओमानमध्ये १८ जणांचा मृत्यू
हृदयाचा ठाव घेणारे ‘अत्तर’ लघुपटाचे पोस्टर प्रदर्शित
