Success in UPSC : निरंजन राजे जाधवराव, हर्षद घोगरे यांचे यूपीएससीत यश

शिवनगर / बावडा : Bharat Live News Media वृत्तसेवा : बारामती तालुक्याच्या माळेगावमधील निरंजन महेंद्रसिंह राजे जाधवराव हे 287 रँक मिळवून तर इंदापूर तालुक्याच्या बावडामधील हर्षद भगवान घोगरे हे 308 व्या रँकने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले. या यशाबद्दल बारामती व इंदापूर तालुक्यातून त्यांचे कौतुक होत आहे. बारामती तालुक्याच्या माळेगावमधील निरंजन महेंद्रसिंह राजे जाधवराव याने यूपीएससी परीक्षेमध्ये 287 रँक मिळवून यश संपादन केले. या यशाबद्दल बारामती तालुक्यातून त्यांचे कौतुक केले जात आहे. निरंजन हा सोमेश्वरनगरमधील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक महेंद्रसिंह राजे जाधवराव यांचा मुलगा आहे.
निरंजन म्हणाला, अभ्यासात सातत्य असेल आणि चालू घडामोडी ज्ञात असतील तर यश नक्की मिळते. माझ्या यशात आई – वडील, शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. ग्रामीण भागातील तरुणांनी या परीक्षेची भीती न बाळगता मनापासून व खडतर प्रयत्न करून अभ्यास केल्यास त्यांनाही यश मिळेल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला. तसेच, इंदापूर तालुक्याच्या बावडामधील हर्षद भगवान घोगरे हे 308 व्या रँकने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले. केंद्रीय लोकसेवा आयोगाने सन 2023 मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.16) दुपारी जाहीर केला.
घोगरे यांनी यापूर्वी 2021 मध्ये यूपीएससी परीक्षा सन 614 रँकने उत्तीर्ण होत यश संपादन केले. सध्या घोगरे हे भारतीय नागरी लेखा सेवा या पदाचे प्रशिक्षण घेत आहेत. प्रशिक्षण घेत असतानाच घोगरेने यूपीएससी परीक्षा पुन्हा देत 308 वी रँक प्राप्त केली. हर्षद घोगरे यांचे वडील भगवान घोगरे हे सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी आहेत.
हेही वाचा
माझे बोट धरून मोदी राजकारणात..: शरद पवारांची नरेंद्र मोदींवर टीका
कोल्हापूर : दूध संस्थेचा चालक तोच मालक
जोरदार शक्तिप्रदर्शनाने शाहू महाराज यांचा उमेदवारी अर्ज
Latest Marathi News Success in UPSC : निरंजन राजे जाधवराव, हर्षद घोगरे यांचे यूपीएससीत यश Brought to You By : Bharat Live News Media.
