छत्तीसगडमध्ये चकमकीत 29 नक्षलवाद्यांचा खात्मा

कांकेर (छत्तीसगड); वृत्तसंस्था : छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील माड परिसरात मंगळवारी झालेल्या चकमकीत म्होरक्या शंकर राव, ललिता माडवी यांच्यासह 29 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. बीएसएफ निरीक्षक रमेश चौधरी यांच्यासह तीन जण जखमी आहेत.
जखमींमध्ये दोन डीआरजी जवानांचा समावेश आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी तातडीने हेलिकॉप्टर उपलब्ध
करून देण्यात आले. घटनास्थळावरून पोलिसांनी 5 एके-47 रायफल जप्त केल्या आहेत. चकमकीत मारले गेलेले शंकर राव तसेच ललिता माडवी हे डीव्हीसी रँकचे नक्षली म्होरके होते. दोघांवर प्रत्येकी 25 लाख रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आलेले होते. याआधी कांकेरमध्ये 25 फेब्रुवारी रोजी हूरतराई जंगलात झालेल्या चकमकीत तीन नक्षल्यांचा खात्मा करण्यात आला होता.
Latest Marathi News छत्तीसगडमध्ये चकमकीत 29 नक्षलवाद्यांचा खात्मा Brought to You By : Bharat Live News Media.
