धुळे : दोंडाईच्या मध्ये जुगार क्लबवरील छाप्यात एक लाखांहून अधिक रोकडसह ऐवज जप्त

धुळे; Bharat Live News Media वृत्तसेवा : धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे जुगाराच्या क्लब वर छापा टाकण्यात आला. या कारवाईत तब्बल एक लाख 77 हजार 540 रुपयांची रोकड आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या माहितीच्या आधारावर करण्यात आली आहे. या संदर्भात दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे जुगाराचा क्लब सुरू असून यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी विश्वासातील पोलीस पथकाला या संशयित ठिकाणी कारवाई करण्यासाठी पाठवले. यावेळी शेडमध्ये जुगाराचा डाव रंगल्याची बाब निदर्शनास आली पोलिसांनी छापा टाकून जुगार खेळणाऱ्या आठ जणांना ताब्यात घेतले तसेच त्यांच्याकडून एक लाख 67 हजार 540 रुपयांची रोकड आणि मुद्देमाल असा एक लाख 77 हजार 540 रुपये किमतीच्या ऐवज जप्त करण्यात आला आहे या संदर्भात दोंडाईचा पोलीस ठाण्यात भैय्या शांताराम संदनशिव रा. दौंडाईचा,अजय अशोक पाटील रा निमगुड , संतोष जानकीरान हिप्परकर , रा.डाबरी दौंडाईचा , रईस युसुफ शेख , रा.चिरगगल्ली नंदुरबार , संदिप कोमलसींग गिरासे , रा सारंगखेडा, छोटु रामा मोरे, रा भोई गल्ली शहादा, अनिल गजमल आगळे, रा पुसनद ता शहादा, रविंद्र शामकुमार सिंधी, रा सिंधी कॉलनी दोंडाईचा, यांच्या विरोधात दोंडाईचा पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली आहे.
Latest Marathi News धुळे : दोंडाईच्या मध्ये जुगार क्लबवरील छाप्यात एक लाखांहून अधिक रोकडसह ऐवज जप्त Brought to You By : Bharat Live News Media.
