गेवराई : मनोज जरांगे समर्थक अमोल खुणे यांच्यावर जीवघेणा हल्ला

गेवराई; पुढारी वृत्तसेवा : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी अमोल खुणे यांच्यावर सोमवारी (दि. १५) रात्रीच्या दरम्यान अज्ञात लोकांकडून हल्ला करण्यात आला. यामध्ये अमोल खुणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी अमोल खुणे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. राज्यात मराठा … The post गेवराई : मनोज जरांगे समर्थक अमोल खुणे यांच्यावर जीवघेणा हल्ला appeared first on पुढारी.

गेवराई : मनोज जरांगे समर्थक अमोल खुणे यांच्यावर जीवघेणा हल्ला

गेवराई; Bharat Live News Media वृत्तसेवा : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी अमोल खुणे यांच्यावर सोमवारी (दि. १५) रात्रीच्या दरम्यान अज्ञात लोकांकडून हल्ला करण्यात आला. यामध्ये अमोल खुणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी अमोल खुणे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेत तब्येतीची विचारपूस केली.
राज्यात मराठा लोकांवर दिवसाढवळ्या हल्ले होत आहेत. राज्याचे गृहमंत्री ज्या गोष्टीवर लक्ष द्यायला नको तेथे लक्ष घालतात. अमोल खुणेंवर झालेल्या हल्ल्यातील आरोपींना अटक करून गृहमंत्री अमोल खुणेंना न्याय देतील का असा सवाल उपस्थित करत मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. तर गृहमंत्र्यांना विनाकारण कामात लक्ष घालायला वेळ आहे. परंतु गोरगरीब मराठा तरुणांवर दिवसा हल्ले होत असतील तर गृहमंत्री कसा न्याय देतात हे पहावेच लागेल. अमोल खुणे यांच्या हल्ला प्रकरणी बीडचे पोलीस अधीक्षक काय ऍक्शन घेतात हे देखील पहावे लागेल अशी तीव्र प्रतिक्रिया देत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देत सहकारी अमोल खुणेंवरील हल्ल्याचा निषेध केला आहे.
Latest Marathi News गेवराई : मनोज जरांगे समर्थक अमोल खुणे यांच्यावर जीवघेणा हल्ला Brought to You By : Bharat Live News Media.