परभणी : धोतरा येथे विद्युत तारेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

पूर्णा; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील धोतरा येथील एका शेतमजूर तरुणाचा आज (दि.१६) विद्युत तारेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. धोतरा येथील हिवरा शिवारात सकाळी ११.३० च्या सुमारास ही घटना घडली. माधव भगवान खैरे (वय २४) असे या मृत तरूणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, माधव खैरे हा तरूण शेतीच्या कामासाठी विद्यूत तारांची जोडणी करत … The post परभणी : धोतरा येथे विद्युत तारेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू appeared first on पुढारी.

परभणी : धोतरा येथे विद्युत तारेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

पूर्णा; Bharat Live News Media वृत्तसेवा : तालुक्यातील धोतरा येथील एका शेतमजूर तरुणाचा आज (दि.१६) विद्युत तारेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. धोतरा येथील हिवरा शिवारात सकाळी ११.३० च्या सुमारास ही घटना घडली. माधव भगवान खैरे (वय २४) असे या मृत तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, माधव खैरे हा तरूण शेतीच्या कामासाठी विद्यूत तारांची जोडणी करत होता. यावेळी विद्युत तारेचा त्याला जोराचा झटका बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच चुडावा पोलिस ठाण्याचे सपोनी नरसिंग पोमनाळकर, पोउनि मुखेडकर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.  कावलगाव येथे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे धोतरा गावावर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा :

नांदेड : इमामवाडी येथील दाम्पत्याच्या मृत्यूप्रकरणी शिक्षकासह तिघांवर गुन्हा दाखल

Ram Navami Nashik | रामनवमी मिरवणूकीनिमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल

मुंबई: मालाड येथील गिरनार अपार्टमेंटमध्ये भीषण आग: ८ जण जखमी

 
Latest Marathi News परभणी : धोतरा येथे विद्युत तारेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.