भाजप विरोधात जनतेत संताप : नाना पटोले

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाचही जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय होईल. भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात प्रचंड चीड मतदारांमध्ये दिसून येत आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्याला लोक पसंती दाखवत आहेत. विदर्भात भाजपच्या दिगजांच्या सभांमध्ये लोक नव्हते. त्यांना लोक आणावे लागले, भाषण सुरू असताना लोक उठून जात होते. काँग्रेसच्या सभेत मात्र लोकांची गर्दी होती. … The post भाजप विरोधात जनतेत संताप : नाना पटोले appeared first on पुढारी.

भाजप विरोधात जनतेत संताप : नाना पटोले

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाचही जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय होईल. भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात प्रचंड चीड मतदारांमध्ये दिसून येत आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्याला लोक पसंती दाखवत आहेत. विदर्भात भाजपच्या दिगजांच्या सभांमध्ये लोक नव्हते. त्यांना लोक आणावे लागले, भाषण सुरू असताना लोक उठून जात होते. काँग्रेसच्या सभेत मात्र लोकांची गर्दी होती. गडचिरोली मधील आदिवासी पंतप्रधान मोदींचा फोटो सुद्धा पाहायला तयार नाहीत एवढी त्यांना चीड आहे, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. (Nana Patole)
आज (दि.16) सांगली आणि भिवंडीतील काँग्रेस नेते मला भेटायला नागपुरात आले त्यांना भेटून, त्यांचे समाधान झाल्यानंतर आमची आघाडी झालेली आहे. आघाडीमध्ये सर्वांचे समाधान होत नाही. आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र मैत्रीमध्ये किती ताणायचे? असाही प्रश्न असतोच. महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर झाले आहे, असे प्रतिपादन नाना पटोले यांनी केले.
दरम्यान, महायुतीत किती भयावह मारामारी आहे, हे सर्वांसमोर येत आहे. आम्ही तर कामालाही लागलो आहोत. तिकडे श्रीकांत शिंदेंची जागा फडणवीस यांना जाहीर करावी लागते, याच्यावरून महायुतीतली भांडणे लक्षात येतात. सांगली आणि भिवंडीचे आमचे लोक भेटायला आले तर आम्ही त्यांचे नक्कीच समाधान करू आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी सर्वांनी मिळून प्रचार करावा अशी विनंती करू. त्या सर्वांना आज आम्ही समजावून सांगून त्यातून मार्ग काढू. भेटून आम्ही त्यांच्याशी बोलू आणि त्यांची नाराजी दूर करू असेही पटोले म्हणाले.(Nana Patole)

आज नागपूर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. विकास ठाकरे यांच्या प्रचारार्थ पारडी, पूर्व नागपूर येथे जाहीर सभेस उपस्थित राहून संबोधित केले. जनतेची लक्षणीय उपस्थिती आणि कार्यकर्त्यांचा उत्साह येत्या परिवर्तनाची साद घालत होता. सभेला संबोधित करताना सांगितले की,… pic.twitter.com/1bWMr9nUOp
— Nana Patole (@NANA_PATOLE) April 15, 2024

हेही वाचा : 

UPSC Exam Result: पहिल्याच प्रयत्नात शेतकऱ्याच्या मुलाची युपीएससी परीक्षेत बाजी: डॉ. अंकेत जाधव ३९५ व्या रँकने उत्तीर्ण
सांगलीत आघाडी धर्म पाळा, वरिष्ठांच्या सुचना : विश्वजीत कदम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अभिनेता सलमान खानची भेट

Latest Marathi News भाजप विरोधात जनतेत संताप : नाना पटोले Brought to You By : Bharat Live News Media.