लसणाच्या गोण्यांच्या आडोशाने अफूचा काळाबाजार, शिरपूर पोलिसांकडून पर्दाफाश

धुळे : पुढारी वृत्तसेवा- लसणाच्या गोण्यांच्या आडोशाने अफूची तस्करी होत असल्याचा प्रकार शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी हाणून पाडला आहे. या कारवाईत सुमारे दहा लाख चाळीस हजार रुपये किमतीचा 52 किलो वजनाची अफूची बोंडे जप्त करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील तसेच गुजरात राज्यातील सीमावर्ती भागांमध्ये ग्रस्त वाढवण्याचे आदेश पोलीस … The post लसणाच्या गोण्यांच्या आडोशाने अफूचा काळाबाजार, शिरपूर पोलिसांकडून पर्दाफाश appeared first on पुढारी.

लसणाच्या गोण्यांच्या आडोशाने अफूचा काळाबाजार, शिरपूर पोलिसांकडून पर्दाफाश

धुळे : Bharat Live News Media वृत्तसेवा- लसणाच्या गोण्यांच्या आडोशाने अफूची तस्करी होत असल्याचा प्रकार शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी हाणून पाडला आहे. या कारवाईत सुमारे दहा लाख चाळीस हजार रुपये किमतीचा 52 किलो वजनाची अफूची बोंडे जप्त करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील तसेच गुजरात राज्यातील सीमावर्ती भागांमध्ये ग्रस्त वाढवण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिले आहेत. त्यानुसार शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी मुंबई आग्रा महामार्गावर गस्त घालने तसेच संशयित गाड्यांची तपासणी करण्याचे अभियान सुरू केले आहे. या अंतर्गतच आज त्यांना अफूची मोठी खेप महामार्गावरून जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी महामार्गावर सीमा तपासणी नाक्याजवळ सापळा लावला.
या अंतर्गत पोलीस कर्मचारी कृष्णा पाटील, बाळासाहेब वाघ, जयराज शिंदे, संतोष पाटील, ठाकरे, प्रविण धनगर, मोहन पाटील, योगेश मोरे, स्वप्निल बांगर, संजय भोई, भुषण पाटील,रणजित वळवी आदींनी गाड्याची तपासणी सुरू केली. यावेळी मध्यप्रदेश राज्यातील सेंधवा कडुन शिरपुरकडे ट्रक क्र.आर जे. 09 जी सी. 4569 हा येताना दिसला पोलीस पथकाने ट्रक थांबवून चालकाची चौकशी केली असता गाडीमध्ये चालक सलामुद्दीन निजामुद्दीन( रा. दमाखेडी ता. सितामऊ जि. मंदसोर ,मध्यप्रदेश) क्लिनर अशोक जगदिश चौहाण,( रा. मानंदखेडा ता. जावरा जि. रतलाम ,मध्यप्रदेश ) हे दोघे आढळले. या दोघांकडे चौकशी केली असता गाडी मधील माल संदर्भात त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलीस पथकाला संशय आला. या गाडीची तपासणी केली असता लसणाच्या गोण्याच्या आडोशाला सुकलेली अफूची बोंडे आढळून आले. अधिक तपासणी केली असता 52 किलो वजनाची सुमारे दहा लाख 40 हजार रुपये किमतीची हीअफुची बोंडे आढळून आली. पोलिसांनी या कारवाईत 15 लाखाच्या ट्रक सह दहा लाख 40 हजार रुपये किमतीची गुंगीकारक अफुची बोंडे असा 25 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या बोंडांच्या माध्यमातून नशेचा काळाबाजार होणार असल्याची बाब स्पष्ट झाल्याने सदर वाहन चालक व क्लीनर यांचेवर गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8(क), 15 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा –

Chhagan Bhujbal | ज्याला तिकीट मिळेल, त्याचे काम करू; नाशिकच्या जागेबाबत भुजबळांची स्पष्टोक्ती
Stock Market Closing Bell | सलग तिसऱ्या सत्रात विक्रीचा मारा, बाजारातील ‘ब्लडबाथ’मागे होते ‘हे ५ घटक
प्रवाशांच्या मदतीसाठी आता ‘प्रवासी मित्र’; एसटी महामंडळाची अभिनव योजना

Latest Marathi News लसणाच्या गोण्यांच्या आडोशाने अफूचा काळाबाजार, शिरपूर पोलिसांकडून पर्दाफाश Brought to You By : Bharat Live News Media.