मुख्यमंत्री शिंदे अभिनेता सलमान खानच्या भेटीला

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ( दि.१६) अभिनेता सलमान खान याची त्याच्या घरी जावून भेट घेतली, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर रविवारी गोळीबाराची घटना घडली होती. या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स गँगमधील अनमोल बिश्नोई, गोल्डी ब्रार व रोहित गोदराने स्वीकारली आहे.
अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी विकी गुप्ता आणि सागर पाल या दोन संशयित आरोपींना पोलिसांनी गुजरातच्या भुज येथून अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना मंगळवारी १० दिवसांची म्हणजेच २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.
#WATCH | Mumbai | Maharashtra CM Eknath Shinde met actor Salman Khan at his residence.
Inside visuals from the residence.
(Source: Eknath Shinde office) pic.twitter.com/lbMmfCOBNm
— ANI (@ANI) April 16, 2024
#WATCH | Mumbai: Maharashtra CM Eknath Shinde arrives at the residence of actor Salman Khan. pic.twitter.com/qFvglS0Q8n
— ANI (@ANI) April 16, 2024
सागर पालने सलमानच्या घरावर गोळी चालवल्याची कबुली दिली आहे. सागर हा हरियाणात काम करत असताना बिश्नोई गँगच्या संपर्कात आल्याची माहीती मिळत आहे. गोळीबारासाठी वापरलेली मोटारसायकल त्यांनी रायगडमधून खरेदी केली होती.
वांद्रे पश्चिममधील सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना शोधण्यात या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाला सोमवारी रात्री उशिरा यश मिळाले. गुजरातमधील भुज येथून दोघांना अटक केली. मंगळवारी दोन्ही आरोपींना घेऊन मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस मुंबईत दाखल झाले. मुंबईत त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा :
सलमान खान धमक्यांना घाबरत नाही, म्हणाला, जे व्हायचे ते होईल…
Salman Khan : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे दोघे अटकेत
Lawrence Bishnoi vs Salman khan | ‘भाईजान’च्या घरावर गोळीबाराचा कट ‘असा’ रचला; सूत्रधार अनमोल बिश्नोई कोण आहे?
Latest Marathi News मुख्यमंत्री शिंदे अभिनेता सलमान खानच्या भेटीला Brought to You By : Bharat Live News Media.
