कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा, फरहान जमादारचे UPSC परीक्षेत यश

केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी (मुख्य) परीक्षा 2023 (UPSC CSE 2023 ) अंतिम निकाल आज ( दि.16 एप्रिल) जाहीर झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांनी या लोकसेवा परीक्षेत दैदीप्यवान यश मिळवले आहे. फरहान इरफान जमादार याने १९१ वी रँक  मिळवत कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. (UPSC Kolhapur News) आई गृहिणी तर वडील खासगी प्रिटींग … The post कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा, फरहान जमादारचे UPSC परीक्षेत यश appeared first on पुढारी.

कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा, फरहान जमादारचे UPSC परीक्षेत यश

मोनिका क्षीरसागर

केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी (मुख्य) परीक्षा 2023 (UPSC CSE 2023 ) अंतिम निकाल आज ( दि.16 एप्रिल) जाहीर झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांनी या लोकसेवा परीक्षेत दैदीप्यवान यश मिळवले आहे. फरहान इरफान जमादार याने १९१ वी रँक  मिळवत कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. (UPSC Kolhapur News)
आई गृहिणी तर वडील खासगी प्रिटींग प्रेसमध्ये कामाला
कोल्हापूरातील सुसंस्कार हायस्कूल, कदमवाडी येथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाले. विवेकानंद कॉलेजमध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सांगलीतील वालचंद इंजनिअरिंग कॉलेजमधून कॉमप्युटर सायन्समधून इंजनिअरिंगची पदवी मिळवली. आई गृहिणी असून, वडील प्रायव्हेट प्रिटींग प्रेसमध्ये काम करतात, असेही फरहान जमादार याने ‘Bharat Live News Media ऑनलाईन’शी बाेलताना सांगितले. (UPSC Kolhapur News)
UPSC Kolhapur News: चौथ्या प्रयत्नात यशाला गवसणी
Bharat Live News Media ऑनलाईन’शी संवाद साधताना फरहान म्‍हणाला, “मी कोल्हापूरमधील ताराबाई पार्क येथील आहे. कॉलेजला असतानाच मी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीला सुरूवात केली. हा माझा चौथा प्रयत्न होता. यूपीएससी परिक्षेत ‘समाजशास्त्र’ (Sociology) हा ऐच्छिक विषय हाेता तर यूपीएससीची संपूर्ण परीक्षा मी इंग्रजी माध्यमातून दिली आहे. यापूर्वी तीनवेळा मुख्य परीक्षेपर्यंत मजल मारली हाेती. मात्र मुलाखतीचा टप्पा मला गाठता आला नव्हता; परंतु चौथ्या प्रयत्नात मला यश मिळाले. (UPSC Kolhapur News)
UPSC परिक्षेची तयारी कोल्हापूरातच
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संपूर्ण परिक्षेची तयारी फरहान याने कोल्हापूरातच केल्याचे सांगितले. केवळ मुख्य आणि मुलाखतीची तयारी त्यांनी दिल्ली येथे जाऊन केली हाेती. UPSC परीक्षेत १९१ वी रँक मिळवल्‍याचे फरहान सांगताे. सलग चार वर्ष अथक प्रयत्न केल्यानंतर फरहान याला UPSC परीक्षेत यश मिळाले आहे. (UPSC Kolhapur News)
हे ही वाचा:

UPSC Exam Result: पहिल्याच प्रयत्नात शेतकऱ्याच्या मुलाची युपीएससी परीक्षेत बाजी: डॉ. अंकेत जाधव ३९५ व्या रँकने उत्तीर्ण
UPSC CSE 2023 अंतिम निकाल जाहीर, आदित्‍य श्रीवास्‍तव देशात प्रथम

 
Latest Marathi News कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा, फरहान जमादारचे UPSC परीक्षेत यश Brought to You By : Bharat Live News Media.