काँग्रेस लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे: नितीन गडकरी

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : 80 वेळा घटना तोडणारे काँग्रेसवाले आज भाजपबद्दल अपप्रचार करीत आहेत. संविधान बदलताच येत नाही, हे वास्तव आहे. सर्वोच्च न्यायालयात केशवानंद भारती केसमध्ये निर्णय दिलेला आहे. संविधानातील मूलभूत रचनेला धक्का लावता येऊ शकत नाही, असे न्यायालयाने आधीच स्पष्ट केले आहे. मात्र, जे कामाच्या भरवशावर निवडून येऊ शकत नाहीत, ते लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी अपप्रचार करीत आहेत, अशी टीका केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. Nitin Gadkari
दक्षिण नागपुरातील म्हाळगीनगर चौक येथे गडकरी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते संजय भेंडे, आमदार मोहन मते, भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र (बंटी) कुकडे, शिवसेनेचे (शिंदे गट) नेते सूरज गोजे आदींची उपस्थिती होती. Nitin Gadkari
‘नागपूर शहरात अजून बरीच कामे करायची आहेत. रिंगरोडवर लवकरच उड्डाणपुलाची निर्मिती होणार आहे. याच मार्गाने इलेक्ट्रिक ट्रॉली बस सुरू करण्याचाही माझा प्रयत्न आहे,’ असेही गडकरी म्हणाले. कुठलेही मदतीचे, विकासाचे काम करताना जात-पात-धर्म बघितला नाही. मी जातीचे राजकारण कधीच केले नाही. ताजबागच्या सौंदर्यीकरणाचे काम केले आणि दीक्षाभूमीचे काम सुरू झाले आहे, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
हेही वाचा
महामार्ग मंत्रालयात मोठा भ्रष्टाचार: पवन खेरा यांचा गडकरी यांच्यावर निशाणा
Govinda meet Nitin Gadkari : नागपुरात गोविंदाने घेतली नितीन गडकरींची भेट
नागपुरात प्रचार जोरात, ठाकरे पवारांच्या भेटीला, फडणवीस गडकरींच्या मदतीला
Latest Marathi News काँग्रेस लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे: नितीन गडकरी Brought to You By : Bharat Live News Media.
