नवी मुंबईत झोपण्याच्या जागेवरून एकाची हत्या

कोपरखैरणे : पुढारी वार्ताहर ;  शनिवारी संध्याकाळी नेरुळ सेक्टर 10 येथे एका ठिकाणी आढळलेल्या मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसली तरी त्याची हत्या करणार्‍या व्यक्तीला मात्र अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. झोपण्याच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती तपासातून पुढे आली. संबंधित बातम्या  Piyush Goyal : मच्छीमारांच्या वस्तीत नाकाला रुमाल लावल्यामुळे गोयलांवर काँग्रेसची टीका … The post नवी मुंबईत झोपण्याच्या जागेवरून एकाची हत्या appeared first on पुढारी.

नवी मुंबईत झोपण्याच्या जागेवरून एकाची हत्या

कोपरखैरणे : Bharat Live News Media वार्ताहर ;  शनिवारी संध्याकाळी नेरुळ सेक्टर 10 येथे एका ठिकाणी आढळलेल्या मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसली तरी त्याची हत्या करणार्‍या व्यक्तीला मात्र अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. झोपण्याच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती तपासातून पुढे आली.
संबंधित बातम्या 

Piyush Goyal : मच्छीमारांच्या वस्तीत नाकाला रुमाल लावल्यामुळे गोयलांवर काँग्रेसची टीका
Stock Market Closing Bell | सलग तिसऱ्या सत्रात विक्रीचा मारा, बाजारातील ‘ब्लडबाथ’मागे होते ‘हे ५ घटक
धक्कादायक! अवघ्या १६ वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू, नुकतीच दिली होती दहावीची परीक्षा

मनोजकुमार प्रजापती असे आरोपीचे नाव असून तो भंगार वा रद्दी वेचून उदरनिर्वाह करतो. नेरुळ येथे एका ठिकाणी पन्नाशीच्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहावर असलेल्या घावावरून ही हत्या असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले व अनोळखी व्यक्ती विरोधात हत्येचा गुन्हा नोंद झाला होता. तपास करताना परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली असता एक भंगार वेचक व्यक्तीच फक्त परिसरात आढळून आली.
शोध घेतला असता या भंगार वेचकाला ताब्यात घेत चौकशी केली असता रेल्वे पटरीशेजारी हवेशीर ठिकाणी रात्री झोपण्यावरून दोघात वाद झाले. त्यातून रागाच्या भरात त्याची हत्या केली अशी कबुली आरोपी प्रजापतीने दिली. मयत आणि आरोपी हे दोघे एकमेकांना ओळखत नव्हते. त्यामुळे अद्याप मयत व्यक्तीची ओळख अजूनही पटू शकलेली नाही,असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांनी सांगितले.
Latest Marathi News नवी मुंबईत झोपण्याच्या जागेवरून एकाची हत्या Brought to You By : Bharat Live News Media.