धक्कादायक ! चाकूने तरुणाच्या गळ्यावर सपासप वार..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : एक वर्षापूर्वी झालेला वाद आणि तरुणाच्या वडिलांनी केलेल्या मारहाणीच्या रागातून सराईत गुन्हेगाराने 29 वर्षीय तरुणाला मटण खाण्यास घालतो म्हणत अंधारात नेऊन अचानक गळ्यावर चाकूने वार करीत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. पुण्याच्या मध्यभागातील राजेंद्रनगर येथे घोलप मटण शॉपसमोर रात्री साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला. यात तरुण गंभीररीत्या जखमी झाला … The post धक्कादायक ! चाकूने तरुणाच्या गळ्यावर सपासप वार.. appeared first on पुढारी.

धक्कादायक ! चाकूने तरुणाच्या गळ्यावर सपासप वार..

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : एक वर्षापूर्वी झालेला वाद आणि तरुणाच्या वडिलांनी केलेल्या मारहाणीच्या रागातून सराईत गुन्हेगाराने 29 वर्षीय तरुणाला मटण खाण्यास घालतो म्हणत अंधारात नेऊन अचानक गळ्यावर चाकूने वार करीत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. पुण्याच्या मध्यभागातील राजेंद्रनगर येथे घोलप मटण शॉपसमोर रात्री साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला. यात तरुण गंभीररीत्या जखमी झाला असून, त्याला तब्बल 19 टाके पडले आहेत. सध्या त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात सिद्धार्थ दत्तात्रय मोरे (वय 24, रा. सेनादत्त पेठ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेत हिंगणे खुर्द येथील तरुण गंभीररीत्या जखमी झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, सिद्धार्थ मोरे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर विश्रामबाग व सिंहगड रोड पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, सिद्धार्थ व तक्रारदार तरुण गेल्या सहा ते सात वर्षांपासून ओळखीचे आहेत. गेल्या वर्षी या दोघांमध्ये वाद झाले. त्या वेळी सिद्धार्थला तक्रारदार तरुणाच्या वडिलांनी मारहाण केली. त्याचा राग आरोपीच्या मनात होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती कार्यक्रम पाहण्यासाठी दोघे दांडेकरपूल परिसरात आले. त्या वेळी दोघांची पुन्हा भेट झाली. त्यानंतर सिद्धार्थने ‘चल तुला मटण खाऊ घालतो,’ असे सांगितले. त्याला गोड बोलून गाडी चालविण्यास दिली. तो पाठीमागे बसला. दोघे राजेंद्रनगर येथील मटण शॉपवर गेले. गाडीवरून उतरत सिद्धार्थने गेल्या वर्षी झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून अचानक तरुणाच्या गळ्यावर धारदार चाकूने वार केला. तरुणाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण, दुसरा वार हातावर बसला. त्याचवेळी तरुणाचा मित्र त्याला वाचविण्यास आल्यानंतर त्यालाही आरोपीने मारहाण केली. या घटनेत तरुण गंभीररीत्या जखमी झाला आहे. तपास सहायक निरीक्षक पी. एम. वाघमारे करीत आहेत.
हेही वाचा

धक्कादायक ! तरुणीला अंगावरील तीळ दाखविण्यास ऑन कॅमेरा भाग पाडले..
Lok Sabha Election 2024 | रिल्स, स्टेटस आणि ट्रोलिंगमधून सोशल मीडियावर प्रचार
आठवी पास अन् डॉक्टरसह वकीलही निवडणूक रिंगणात

Latest Marathi News धक्कादायक ! चाकूने तरुणाच्या गळ्यावर सपासप वार.. Brought to You By : Bharat Live News Media.