छत्रपती संभाजीनगर : गळफास घेऊन शेतकऱ्याने जीवन संपवले

पैठण ; पुढारी वृत्तसेवा पैठण तालुक्यातील सालवडगाव येथे सोमवारी रात्री कर्जबाजाराला कंटाळून शेतकऱ्याने आपल्या शेतात गळफास घेऊन जीवन संपवल्‍याची घटना घडली आहे. जीवन संपवलेल्‍या शेतकऱ्याचे नाव सतीश बाबासाहेब वाकडे रा. सालवडगाव ता. पैठण असे आहे. तालुक्यातील सालवडगाव येथील कर्जबाजारी झालेल्या सतीश बाबासाहेब वाकडे (वय ३६) या शेतकऱ्याने सोमवारी रोजी रात्री सात वाजण्याच्या दरम्यान आपल्या शेतात … The post छत्रपती संभाजीनगर : गळफास घेऊन शेतकऱ्याने जीवन संपवले appeared first on पुढारी.

छत्रपती संभाजीनगर : गळफास घेऊन शेतकऱ्याने जीवन संपवले

पैठण ; Bharat Live News Media वृत्तसेवा पैठण तालुक्यातील सालवडगाव येथे सोमवारी रात्री कर्जबाजाराला कंटाळून शेतकऱ्याने आपल्या शेतात गळफास घेऊन जीवन संपवल्‍याची घटना घडली आहे. जीवन संपवलेल्‍या शेतकऱ्याचे नाव सतीश बाबासाहेब वाकडे रा. सालवडगाव ता. पैठण असे आहे.
तालुक्यातील सालवडगाव येथील कर्जबाजारी झालेल्या सतीश बाबासाहेब वाकडे (वय ३६) या शेतकऱ्याने सोमवारी रोजी रात्री सात वाजण्याच्या दरम्यान आपल्या शेतात गळफास लावून जीवन संपवले. जीवन संपवण्यापूर्वी सदरील घटनेची माहिती मृत शेतकऱ्यांनी स्वतः फोनवर गावातल्या व्यक्तीला व नातेवाईकांना देऊन आपली जीवन यात्रा संपवली. या घटने संदर्भात गावाचे पोलीस पाटील अशोक ठोंबरे यांनी पाचोड पोलीस ठाण्याचे सपोनि शरदचंद्र रोडगे यांना दिली.
यानंतर तात्काळ पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सदरील शेतकऱ्याचे मृतदेह पाचोड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला असून, मंगळवारी दि.१६ रोजी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. यासंदर्भात पाचोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सपोनि शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
हेही वाचा :

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोघांना १० दिवसांची पोलीस कोठडी 
Sangli Lok Sabha: अखेर शक्तिप्रदर्शन करत विशाल पाटील यांचा उमेदवार अर्ज दाखल

Lok Sabha Election 2024 : स्वाभिमानी रयत शाहू महाराजांच्या पाठिशी : मालोजीराजे छत्रपती

Latest Marathi News छत्रपती संभाजीनगर : गळफास घेऊन शेतकऱ्याने जीवन संपवले Brought to You By : Bharat Live News Media.