अखेर शक्तिप्रदर्शन करत विशाल पाटील यांचा उमेदवार अर्ज दाखल

सांगली; Bharat Live News Media वृत्तसेवा : सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी आज (दि.१६) शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केला. संपूर्ण जिल्ह्यातून काँग्रेस कार्यकर्ते, समर्थक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. (Sangli Lok Sabha Election)
विशाल पाटील यांनी सोमवारी अपक्ष व काँग्रेस पक्षाकडून एक, असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज सकाळी त्यांनी शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केले. सकाळी ९.३० वाजता गणपती मंदिरामध्ये दर्शन घेऊन पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केले.
हेही वाचा
Sangli Lok Sabha Election | विशाल पाटील यांची अखेर बंडखोरी; आज शक्तिप्रदर्शन
Sangli Lok Sabha : सांगली लोकसभेबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार : डॉ. विश्वजीत कदम
Sangli Lok Sabha Vishwajeet Kadam | ‘सांगली’बाबत काँग्रेसचा आग्रह कायम! विश्वजित कदम यांनी जाहीर केली भूमिका
Latest Marathi News अखेर शक्तिप्रदर्शन करत विशाल पाटील यांचा उमेदवार अर्ज दाखल Brought to You By : Bharat Live News Media.
