मुलाला अठराव्या वाढदिवशी दिली पाच कोटींची गाडी!

नवी दिल्ली : कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात त्याचा वाढदिवस आनंदाचा दिवस असतो व त्यादिवशी मिळालेली भेटवस्तू सर्वात सुंदर भेट असते. जर गिफ्ट महागडी असेल तर आनंद दुप्पट होतो. 18 वर्षांच्या तरुणाच्या आयुष्यात वाढदिवसाच्या दिवशी असा क्षण आला की, हा क्षण तो आयुष्यभर विसरणार नाही. एका उद्योगपती वडिलांनी आपल्या मुलाच्या 18 व्या वाढदिवसानिमित्त त्याला अशी महागडी भेट … The post मुलाला अठराव्या वाढदिवशी दिली पाच कोटींची गाडी! appeared first on पुढारी.

मुलाला अठराव्या वाढदिवशी दिली पाच कोटींची गाडी!

नवी दिल्ली : कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात त्याचा वाढदिवस आनंदाचा दिवस असतो व त्यादिवशी मिळालेली भेटवस्तू सर्वात सुंदर भेट असते. जर गिफ्ट महागडी असेल तर आनंद दुप्पट होतो. 18 वर्षांच्या तरुणाच्या आयुष्यात वाढदिवसाच्या दिवशी असा क्षण आला की, हा क्षण तो आयुष्यभर विसरणार नाही. एका उद्योगपती वडिलांनी आपल्या मुलाच्या 18 व्या वाढदिवसानिमित्त त्याला अशी महागडी भेट दिली. त्यांनी आपल्या मुलाला 5 कोटी रुपये किमतीची अलिशान कार भेट म्हणून दिली. बर्थडे गिफ्टचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडीओमध्ये दिसते की, वडील आपल्या मुलाला त्याच्या स्वप्नातील कार गिफ्ट दिली आहे. याची किंमत कोटींच्या घरात आहे. या कारचे नाव लम्बोर्गिनी हुराकन एसटीओ आहे. विवेक कुमार रूंगटा आणि त्यांचा मुलगा तरुष यांचा हा व्हिडीओ पाहून तुमच्या चेहर्‍यावरही हास्य उमटल्याशिवाय राहणार नाही. तरुष याने त्याच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, माझ्या स्वप्नातील कार भेट म्हणून देऊन माझा 18 वा वाढदिवस खास व जादुई बनवण्यासाठी माझे वडील विवेक कुमार रूंगटा यांचे आभार व खूप-खूप प्रेम! तुमचे प्रेम व समर्थन माझ्यासाठी सर्वकाही आहे.
व्हिडीओमध्ये दिसते की, रूंगटा  आपल्या मुलासह लम्बोर्गिनीच्या शोरूममध्ये प्रवेश करतात जसा-जसा व्हिडीओ पुढे जातो, पिवळ्या रंगाची लक्झरी कारचे अनावरण होते. व्हिडीओच्या शेवटी तरुष आपल्या वडिलांना आनंदाने मिठी मारतो. हा व्हिडीओ मागच्या महिन्यात पोस्ट केला होता. हा व्हिडीओ 11 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. याला हजारो लाईक्स मिळाले असून अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ लम्बोर्गिनी अबू धाबी आणि दुबईतील अधिकृत इंस्टाग्राम पेजवरही पोस्ट केला गेला आहे. या पोस्टवर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिले की, खूपच चांगली गाडी, अभिनंदन, अन्य एकाने म्हटले की, अभिनंदन भावा, तुझा प्रवास चांगला होईल.
Latest Marathi News मुलाला अठराव्या वाढदिवशी दिली पाच कोटींची गाडी! Brought to You By : Bharat Live News Media.