दु्र्दैवी : अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस हवालदाराचा मृत्यू

रावेत : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरून निघालेल्या पोलीस हवालदार सचिन नरुटे (वय ३८, रा. वाकड) यांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. १५) रात्री साडेदहाच्या सुमारास बंगळुरू-मुंबई महामार्गावर रावेत येथे घडली. अपघातानंतर चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला आहे. सचिन नरुटे देहूरोड पोलीस ठाण्यात कार्यरत होते. नरुटे यांच्या मागे पत्नी आणि दोन लहान मुली आहेत.
हेही वाचा
तृणमूलपुढे भाजपचे जबरदस्त आव्हान
चंद्रपूर : एटीएम मधून पैसे चोरणाऱ्या टोळीस अटक
चंद्रपूरसह विदर्भातील सर्वच जागांवर महायुती जिंकेल : चित्रा वाघ
Latest Marathi News दु्र्दैवी : अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस हवालदाराचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.
