महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हस्ते महामानवाचे प्रतिमापूजन

पिंपळनेर, जि.धुळे : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील निजामपूर माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे (ता.साक्री) येथील मातोश्री सेवाभावी संस्थेतर्फे रविवारी (दि.१४) खुडाणे चौफुलीवर विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना १३३ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. महिला पोलीस कर्मचारी नम्रता मगर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. तसेच तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीचेही पूजन करण्यात आले. आदर्श विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे … The post महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हस्ते महामानवाचे प्रतिमापूजन appeared first on पुढारी.

महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हस्ते महामानवाचे प्रतिमापूजन

पिंपळनेर, जि.धुळे : Bharat Live News Media वृत्तसेवा
साक्री तालुक्यातील निजामपूर माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे (ता.साक्री) येथील मातोश्री सेवाभावी संस्थेतर्फे रविवारी (दि.१४) खुडाणे चौफुलीवर विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना १३३ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. महिला पोलीस कर्मचारी नम्रता मगर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. तसेच तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीचेही पूजन करण्यात आले. आदर्श विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक जगदीश पवार यांनी बुद्धवंदना म्हटली.
संस्थेचे अध्यक्ष प्रा. भगवान जगदाळे यांनी मनोगत व्यक्त केले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे शब्दातीत असून त्यांचे योगदान हे अतुलनीय आहे असे प्रतिपादन प्रा. जगदाळे यांनी केले. मातोश्री सेवाभावी संस्थेतर्फे अध्यक्ष प्रा. भगवान जगदाळे यांच्या हस्ते प्रमुख अतिथी एलपीसी नम्रता मगर यांना ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांचे चरित्र भेट देऊन सन्मानित केले.

कार्यक्रमाप्रसंगी माजी उपप्राचार्य प्रा. एस. के. वाणी, सम्यक निकम, शिवाजी पाटील, भागवत शाह, राम साळे, राजेंद्र शिरसाट, गोकुळ बदामे, किशोर जगताप, गोपाल अहिरे, गणेश खारकर, नितीन माळी, किरण भदाणे आदींची प्रमुख उपस्थिती होती. मातोश्री सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष राजनारायण जगदाळे, सचिव सुशीलकुमार जगदाळे, संजय बेडसे, राजेश बेडसे, इंद्रजित खैरनार, गोकुळ देवरे, भैय्या गुरव यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. मातोश्री सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.भगवान जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
हेही वाचा:

Srinagar | श्रीनगरच्या झेलम नदीत बोट उलटली, ४ जणांचा मृत्यू, ५ शाळकरी मुलांसह अनेकजण बेपत्ता
‘आप’चा र्‍हास सुरु होण्याची शक्यता
Pune : स्कूल बसचालकाला 39 हजारांचा दंड; ‘हे’ आहे कारण

Latest Marathi News महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हस्ते महामानवाचे प्रतिमापूजन Brought to You By : Bharat Live News Media.