मध्य पूर्वेतील तणावामुळे सेन्सेक्स, निफ्टी सलग तिसऱ्या सत्रात घसरले, रुपयाही गडगडला

पुढारी ऑनलाईन : भारतीय शेअर बाजारात मंगळवारी सलग तिसऱ्या सत्रात घसरण दिसून आली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ५५० अंकांनी घसरला. त्यानंतर काहीवेळातच त्यात सुधारणा दिसून आली. सकाळी ९.४५ च्या सुमारास सेन्सेक्स ३०० अंकांनी घसरून ७३ हजारांवर व्यवहार करत होता. तर निफ्टी २२,२०० च्या खाली आला. (Stock Market Updates) देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांकांची सुरुवात सलग तिसऱ्या सत्रात घसरणीसह … The post मध्य पूर्वेतील तणावामुळे सेन्सेक्स, निफ्टी सलग तिसऱ्या सत्रात घसरले, रुपयाही गडगडला appeared first on पुढारी.

मध्य पूर्वेतील तणावामुळे सेन्सेक्स, निफ्टी सलग तिसऱ्या सत्रात घसरले, रुपयाही गडगडला

Bharat Live News Media ऑनलाईन : भारतीय शेअर बाजारात मंगळवारी सलग तिसऱ्या सत्रात घसरण दिसून आली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ५५० अंकांनी घसरला. त्यानंतर काहीवेळातच त्यात सुधारणा दिसून आली. सकाळी ९.४५ च्या सुमारास सेन्सेक्स ३०० अंकांनी घसरून ७३ हजारांवर व्यवहार करत होता. तर निफ्टी २२,२०० च्या खाली आला. (Stock Market Updates)
देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांकांची सुरुवात सलग तिसऱ्या सत्रात घसरणीसह झाली. इराण-इस्रायल युद्धामुळे मध्यपूर्वेत निर्माण झालेला तणाव आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीच्या दृष्टिकोनाबाबत अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार चिंतेत राहिले. यामुळे आशियाई बाजारांत याचे पडसाद दिसून येत आहेत. तर अमेरिकेच्या शेअर बाजारातील निर्देशांकही सोमवारी घसरून बंद झाले होते.
सेन्सेक्स आज ७२,८९२ वर खुला झाला. त्यानंतर तो ७३ हजारांवर गेला. सेन्सेक्सवर इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, इन्फोसिस, बजाज फिनसर्व्ह, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, टीसीएस हे शेअर्स घसरले आहेत. तर मारुती, एम अँड एम, टाटा स्टील हे शेअर्समध्ये किरकोळ तेजी दिसून येत आहे.
निफ्टीवर LTIMindtree, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस हे टॉप लूजर्स आहेत. तर ओएनजीसी, हिरो मोटोकॉर्प, बीपीसीएल, कोल इंडिया हे शेअर्स टॉप गेनर्स आहेत. निफ्टी बँक, निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेसदेखील घसरले आहेत. (Stock Market Updates)
भारतीय रुपयाही घसरला
भारतीय रुपया मंगळवारी निचांकी पातळीवर घसरला. मध्य पूर्वेतील व्यापक संघर्षाच्या चिंतेमुळे आणि फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करण्यासाठी आणखी विलंब करेल या शक्यतेने आशियाई बाजारांत चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. दरम्यान, भारतीय रुपया आज अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ८३.५१०० वर खुला झाला. मागील सत्रातील ८३.४५०० वरून रुपया आणखी खाली आला. ४ एप्रिल रोजी रुपयाने ८३.४५५० चा निचांक गाठला होता. डॉलर निर्देशांक जवळपास सहा महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर गेला आहे. पण आशियाई चलनांत घसरण झाली आहे.
Latest Marathi News मध्य पूर्वेतील तणावामुळे सेन्सेक्स, निफ्टी सलग तिसऱ्या सत्रात घसरले, रुपयाही गडगडला Brought to You By : Bharat Live News Media.