पोलिस शिपायाला मारहाण; येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : मित्रांच्या भांडणात पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना जेल रोड मार्शल ड्युटीवर असलेल्या पोलिस शिपायाची गचांडी पकडत मारहाण करणार्‍या एकावर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 13 एप्रिल रोजी रात्री पावणेआठ ते सव्वाआठच्या सुमारास घडला. अक्षय रवींद्र बडगुजर (वय 28, रा. गायरानवस्ती, केशवनगर, मुंढवा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे … The post पोलिस शिपायाला मारहाण; येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

पोलिस शिपायाला मारहाण; येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : मित्रांच्या भांडणात पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना जेल रोड मार्शल ड्युटीवर असलेल्या पोलिस शिपायाची गचांडी पकडत मारहाण करणार्‍या एकावर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 13 एप्रिल रोजी रात्री पावणेआठ ते सव्वाआठच्या सुमारास घडला. अक्षय रवींद्र बडगुजर (वय 28, रा. गायरानवस्ती, केशवनगर, मुंढवा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिस शिपाई विजय बाळासाहेब माने यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दि. 13 एप्रिल रोजी फिर्यादी विजय माने हे जेल रोड येथे मार्शल ड्युटीवर होते. त्या वेळी उमेश तटकरे यांच्याबरोबर अक्षय बडगुजर हा वाद घालत होता. याबाबतची माहिती माने यांना त्यांचे सहकारी डुकरे यांनी दिली.
तटकरे हे माने यांचे मित्र आहेत. विजय माने हे भांडणाच्या ठिकाणी गेले व तेथून ते उमेश तटकरे यांना बडगुजर याच्याविरोधात तक्रार करण्यासाठी दुचाकीवर घेऊन जात होते. त्याच वेळी बडगुजर हा मागून पळत त्यांच्याकडे गेला. त्याने गाडीचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत माने यांच्या डोक्यात मारून त्यांची गचांडी पकडली. यात त्यांच्या शर्टाच्या गुंड्या तुटल्या. ते पुन्हा दुचाकीवरून जात असताना त्यांना बडगुजर याने डॉन बॉस्को स्कूलजवळ माने यांच्या डोक्यात बुक्की मारली, त्यामुळे गाडीवरचा तोल जाऊन दोघेही खाली पडले. बडगुजर याने तटकरे यांना व माने यांना मारण्यास सुरुवात केली. पुढील तपास येरवडा पोलिस करत आहेत.
हेही वाचा

पश्चिम आशियातील अशांतता
जिल्ह्यातील पोषण आहाराची तपासणी कर : जिल्हा परिषद प्रशासनाचे निर्देश
आता होणार उन्हाळी हंगामातील प्रत्येक पिकाची नोंद..

Latest Marathi News पोलिस शिपायाला मारहाण; येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल Brought to You By : Bharat Live News Media.