धुळे येथे महिला ग्रामसेविकेला पंधरा हजाराची लाच घेताना अटक

धुळे : Bharat Live News Media वृत्तसेवा
रस्ता कॉंक्रिटीकरणाचे बिल अदा करण्याच्या मोबदल्यात १५ हजाराची लाच स्वीकारणाऱ्या शिंदखेडा तालुक्यातील चौगाव बुद्रुक येथील महिला ग्रामसेविकेला धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. सलग झालेल्या या दुसऱ्या कारवाईमुळे धुळे जिल्ह्यातील लाचखोरांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान शासकीय काम करण्यासाठी नागरिकांनी कुणालाही लाच देऊ नये असे आवाहन उपधीक्षक अभिषेक पाटील यांनी केले आहे.
यातील तक्रारदार यांनी ग्रामपंचायत चौगांव बु. येथे १५ व्या वित्त आयोगांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम घेवुन ते काम पुर्ण केले. सदर कामावर झालेल्या खर्चाचे बिल तक्रारदार यांना अदा करण्यात आले होते. तसेच तक्रारदार यांनी मौजे चौगांव बु. येथे रस्ता सिमेंट कॉंक्रीटीकरणाचे काम केले असुन त्या कामाकरीता झालेल्या खर्चाचे बिल त्यांना अदा करण्यात आलेले नव्हते .म्हणुन तक्रारदार यांनी सुमारे १ महिन्यापुर्वी ग्रामसेविका राजबाई पाटील यांची भेट घेवुन त्यांनी केलेल्या रस्ता सिमेंट कॉक्रीटीकरणाच्या कामावर झालेल्या खर्चाचे बिल अदा करण्याची विनंती केली.यावेळी ग्रामसेविका राजबाई पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे रस्ता कॉकीटीकरणावर झालेल्या खर्चाचे बिल काढण्याकरीता तसेच तक्रारदार यांनी यापुर्वी केलेल्या पेव्हर ब्लॉकच्या कामाचे बिल काढून दिल्याचे मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे २५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याने तकारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधिक्षक अभिषेक पाटील यांच्या कडे धुळे कार्यालयाकडे तक्रार दिली होती.
या तक्रारीची पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान ग्रामसेविका राजबाई पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे २५ हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती १५ हजार रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केले. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, मकरंद पाटील, प्रविण पाटील, संतोष पावरा, प्रविण मोरे, रामदास बारेला, प्रशांत बागुल, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर, मपोकॉ. दिपाली सोनवणे या पथकाने सापळा लावला.यावेळी तक्रारदार यांचेकडुन १५ हजार रुपये लाचेची रक्कम त्यांचे शिंदखेडा येथील राहते घरी स्वतः स्विकारतांना ग्रामसेविका राजबाई पाटील यांना रंगेहात पकडण्यात आले . त्यांचे विरुध्द शिंदखेडा येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन
कोणतेही शासकीय काम नियमकुल करण्यासाठी लाच मागितल्यास त्याची तक्रार या विभागाकडे करावी. तक्रार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती गुप्त ठेवण्यात येईल. नागरिकांनी समाजातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी शासनाला मदत करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अभिषेक पाटील यांनी केले आहे.
Latest Marathi News धुळे येथे महिला ग्रामसेविकेला पंधरा हजाराची लाच घेताना अटक Brought to You By : Bharat Live News Media.
