लोकसभा निवडणुकीवर जगाचे बारकाईने लक्ष

गेल्या काही वर्षात भारताचा जगभरात दबदबा वाढताना दिसत आहे, जागतिक महासत्तेच्या दिशेने देशाची वेगवान वाटचाल सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगभरातून भारतातील लोकसभा निवडणुकांचा कानोसा घेतला जात आहे. परदेशस्थ भारतीय मंडळी तर इथल्या दैनंदिन घडामोडीवरही लक्ष ठेवून असलेली दिसतात. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाचा करिष्मा जगभर चर्चेत आहे. त्याचप्रमाणे इंग्लंडला मागे टाकून भारत ही जगातील पाचव्या … The post लोकसभा निवडणुकीवर जगाचे बारकाईने लक्ष appeared first on पुढारी.

लोकसभा निवडणुकीवर जगाचे बारकाईने लक्ष

सुनील कदम

गेल्या काही वर्षात भारताचा जगभरात दबदबा वाढताना दिसत आहे, जागतिक महासत्तेच्या दिशेने देशाची वेगवान वाटचाल सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगभरातून भारतातील लोकसभा निवडणुकांचा कानोसा घेतला जात आहे. परदेशस्थ भारतीय मंडळी तर इथल्या दैनंदिन घडामोडीवरही लक्ष ठेवून असलेली दिसतात.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाचा करिष्मा जगभर चर्चेत आहे. त्याचप्रमाणे इंग्लंडला मागे टाकून भारत ही जगातील पाचव्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता म्हणून पुढे आलेला आहे. दिवसेंदिवस भारत हा एक टेक्नॉलॉजी हब म्हणून प्रगतिपथावर आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर देशातील लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधलेले दिसत आहे.
मागील दोन-अडीच वर्षांपासून युक्रेन आणि रशियातील युद्धाचा भडका उडालेला आहे. त्यानिमित्त अमेरिकेसह युरोपियन महासंघाने रशियावर आर्थिक निर्बंध लादले. पण भारताने या आर्थिक निर्बंधांचा फारसा बाऊ न करता रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेलाची आयात वाढविली. भारताच्या या कृतीतून भारत आता अमेरिका किंवा युरोपियन महासंघाच्या इशार्‍यावर डोलणार नाही, असा अप्रत्यक्ष संदेश जगभर पोहोचला गेला आहे. त्याचबरोबर युक्रेन-रशिया संघर्षात केवळ भारतच यशस्वी मध्यस्थी करू शकतो, याचीही जगाला खात्री पटलेली आहे. त्यामुळे जगभरातून मोदी यांनी या प्रकरणी यशस्वी मध्यस्थी करण्याची मागणी झाली होती. मोदींनीही रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना हा जमाना युद्धाचा नव्हे तर डेमॉक्रसी, डिप्लोमसी आणि डायलॉगचा असल्याचे ठणकावून सांगितले. त्यानंतर रशिया-युक्रेन युद्धज्वर काहीसा कमी झाला आहे. भारताच्या शब्दाला जागतिक पातळीवर महत्त्व दिले जात असल्याचा संदेश त्यातून दिला गेला. या पार्श्वभूमीवर भारतातील जनतेचे मोदींच्या बाबतीत काय मत आहे, हे या निवडणुकीच्या निमित्ताने स्पष्ट होणार आहे. त्यामुळे संपूर्ण जग या निवडणुकीचा कानोसा घेत असल्याचे दिसत आहे.
संयुक्त राष्ट्रसंघात भारताला स्थायी सदस्यत्व देण्याचा मुद्दा वर्षानुवर्षे केवळ चर्चेत आहे. मात्र, सप्टेंबर 2022 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत अमेरिका आणि रशियानेही भारताच्या स्थायी सदस्यत्वाबद्दल अनुकूल भूमिका स्वीकारल्याचे जाहीर केले. त्यामुळे भारताच्या स्थायी सदस्यत्वातील दोन मोठे अडथळे दूर झाले आहेत. जागतिक महासत्तेच्या दिशेने पडलेले हे महत्त्वाचे पाऊल समजण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी आणि त्यांचा भाजप याबद्दल देशातील लोकांचा कल काय आहे, हे या निवडणूक निकालाने स्पष्ट होणार आहे. त्यामुळेही जगभरातील लोकसमुदाय देशातील लोकसभा निवडणुकांवर लक्ष ठेवून आहे.
चीनवर अविश्वास!
चीनमुळेच संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट ओढवले, यावर जगभरातील प्रमुख देशांचा आणि तिथल्या लोकांचा ठाम विश्वास आहे. चीनच्या वाढत्या साम्राज्यवादाला आणि जागतिक प्रभावाला आळा घालण्याची चर्चा जगभरातील वेगवेगळ्या व्यासपीठांवरून होत असते. आज चीनचे जागतिक पातळीवर जे स्थान आहे, ते स्थान भविष्यात केवळ भारतच घेऊ शकतो, असा जगातील अनेक देशांचा विश्वास आहे. त्यामुळे जगातील अनेक देश आजकाल याकामी भारताला सहकार्य करण्यासाठी आणि भारताचे सहकार्य घेण्यासाठी सरसावलेले दिसत आहेत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच हे होऊ शकते, असा जागतिक समुदायाचा अंदाज आहे. त्यामुळेही या निवडणुकीकडे आणि त्याच्या निकालाकडे जागतिक समुदाय आणि तिथली सर्वसामान्य जनता लक्ष ठेवून आहे. संयुक्त राष्ट्राची आमसभा, जी-7 परिषद, रशिया-युक्रेन युद्ध, इस्रायल-हमास युद्ध, जागतिक आर्थिक महासत्ता, देशाची होत असलेली तांत्रिक प्रगती, पायाभूत सोयीसुविधा इत्यादी सर्व ठिकाणी मोदी यांनी आपल्या नेतृत्वाची झलक दाखवून दिली आहे. या निवडणुकीत मोदी यांच्याविषयी देशातील जनमनाचा कानोसा जगाला पाहायला मिळणार आहे, म्हणूनच अवघ्या जगाचे लक्ष या निवडणुकीकडे वेधले गेले आहे.
भारताच्या नेतृत्वावर जागतिक मोहर शक्य!
आज मोदींच्या नेतृत्वाचा करिष्मा जगभर पाहायला मिळतोच आहे. दिवसेंदिवस भारताच्या भूमिकेला जगाचा पाठिंबा मिळताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या निवडणुकीत मोदी आणि त्यांच्या भाजपने लक्षवेधी विजय मिळविल्यास नरेंद्र मोदी आणि पर्यायाने भारताच्याही जागतिक नेतृत्वावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या निवडणुकीला जागतिक पातळीवर एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
Latest Marathi News लोकसभा निवडणुकीवर जगाचे बारकाईने लक्ष Brought to You By : Bharat Live News Media.