‘राष्ट्रीय आरोग्य’वर खर्च निम्माच! योजनेची व्याप्ती वाढूनही निधी उपयोगात घटच
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचाव्यात यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरु केले. याअंतर्गत विविध योजना राबवण्यासाठी महापालिकेला निधी दिला जातो. गेल्या चार वर्षांमध्ये तरतुदीच्या तुलनेत अभियानावरील खर्चात घट झाल्याचे महापालिकेकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत मातृ मृत्यूदर, बालमृत्यू दर कमी करणे, महिलांमध्ये अशक्तपणा आणि प्रतिबंध कमी करणे, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजारांचा प्रादूर्भाव कमी करणे, क्षयरोग आणि कुष्ठरोगाचे प्रमाण कमी करणे आदी कार्यक्रम राबवले जातात. त्यासाठी आशा सेविकांमार्फत जनजागृती केली जाते.
जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अशा योजनांचा लाभ लाभार्थीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र, योजनांची व्याप्ती वाढत असताना खर्चाचे प्रमाण कमी होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महापालिकेला 2023-24 या आर्थिक वर्षासाठी फेब्रुवारी महिन्यापर्यंत 46 कोटी 28 लाख रुपये इतकी तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी 21 कोटी 91 लाख रुपये इतकी रक्कम खर्च करण्यात आली आहे. म्हणजेच, तरतुदीच्या केवळ 47 टक्के रक्कम खर्च करण्यात आली आहे.
हेही वाचा
सत्तेचा उपयोग विरोधकांना जेलमध्ये पाठवण्यासाठी : शरद पवार
Indian Navy : भारतीय नौदलापुढील आव्हाने
Pune : भोगवटा पत्रासोबतच मिळकतकराची आकारणी..!
Latest Marathi News ‘राष्ट्रीय आरोग्य’वर खर्च निम्माच! योजनेची व्याप्ती वाढूनही निधी उपयोगात घटच Brought to You By : Bharat Live News Media.