बीड : परळी रेल्वे स्थानकावर लिफ्टमध्ये अडकले प्रवासी

परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा : परळी वैजनाथ रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर रेल्वे प्रवाशांसाठी असलेल्या लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने  लिफ्ट मध्येच बंद पडली. या लिफ्टमध्ये काही प्रवासी अडकून बसले होते.  लिफ्ट अचानकपणे बंद पडल्याने अडकल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. परळी रेल्वे स्थानकावर (ता.15) रात्री ९ वा. प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर येणारी परळी-अकोला गाडीला जाण्यासाठी काही प्रवासी … The post बीड : परळी रेल्वे स्थानकावर लिफ्टमध्ये अडकले प्रवासी appeared first on पुढारी.

बीड : परळी रेल्वे स्थानकावर लिफ्टमध्ये अडकले प्रवासी

परळी वैजनाथ, Bharat Live News Media वृत्तसेवा : परळी वैजनाथ रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर रेल्वे प्रवाशांसाठी असलेल्या लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने  लिफ्ट मध्येच बंद पडली. या लिफ्टमध्ये काही प्रवासी अडकून बसले होते.  लिफ्ट अचानकपणे बंद पडल्याने अडकल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली.
परळी रेल्वे स्थानकावर (ता.15) रात्री ९ वा. प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर येणारी परळी-अकोला गाडीला जाण्यासाठी काही प्रवासी लिफ्ट मधून  जात असताना या लिफ्टमध्ये  बिघाड झाला आणि लिफ्ट बंद होवून मध्येच अडकून राहिली. त्यामुळे बराच वेळ  लिफ्टमध्ये प्रवाशी अडकून राहिले होते.  लिफ्टमध्ये प्रवासी अडकल्याचे लक्षात येताच स्थानकावरील नागरिकांच्या लक्षात येताच, नागरिकांनी सतर्कता दाखवत ही लिफ्ट खाली घेतली. त्यानंतर लिफ्टमध्ये अडकलेल्या प्रवास्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
दरम्यान अनेक वेळा परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाच्या प्रशासनाचा अनियाेजित कारभार नेहमीच समोर येतो. यातच आता रेल्वे स्थानकातील लिफ्ट मध्ये प्रवासी अडकल्याची घटना समोर आली. त्यामुळे रेल्वे स्थानकावरील तांत्रिक विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्ठित होत आहे. वास्तविक पाहता रेल्वे स्थानकातील ज्या लिफ्ट आहेत त्या लिफ्ट वर देखरेख ठेवण्यासाठी तांत्रिक विभागाचे कर्मचारी नियुक्त केलेले असतात. मात्र आज जेव्हा ही लिफ्ट अडकली तेव्हा प्रवास्यांना स्थानिकांनीच  मदत केली.  रेल्वेची ही लिफ्ट अनेक वेळा बिघाडलेली असते. त्यामुळे या लिफ्टमध्ये असे प्रकार पाहावयास मिळतात. यापूर्वी सुद्धा अनेक प्रवाशांची अशाच प्रकारे तारांबळ उडालेली आहे. या गोष्टीकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
Latest Marathi News बीड : परळी रेल्वे स्थानकावर लिफ्टमध्ये अडकले प्रवासी Brought to You By : Bharat Live News Media.