धुळे : साक्री पंचायत समितीच्या अभियंत्याला बेड्या, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला यश

धुळे; पुढारी वृत्तसेवा : मंजूर घरकुलाचे मुल्यांकन पंचायत समितीमध्ये सादर करण्यासाठी १ हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या साक्री पंचायत समितीच्या गृहनिर्माण विभागाच्या अभियंत्याला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. परेश प्रदीपराव शिंदे असे या अभियंत्याचे नाव आहे. त्यांच्या विरोधात साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे मौजे घोडदे येथील रहिवासी असून त्यांना … The post धुळे : साक्री पंचायत समितीच्या अभियंत्याला बेड्या, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला यश appeared first on पुढारी.

धुळे : साक्री पंचायत समितीच्या अभियंत्याला बेड्या, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला यश

धुळे; Bharat Live News Media वृत्तसेवा : मंजूर घरकुलाचे मुल्यांकन पंचायत समितीमध्ये सादर करण्यासाठी १ हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या साक्री पंचायत समितीच्या गृहनिर्माण विभागाच्या अभियंत्याला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. परेश प्रदीपराव शिंदे असे या अभियंत्याचे नाव आहे. त्यांच्या विरोधात साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हे मौजे घोडदे येथील रहिवासी असून त्यांना शबरी आवास योजने अंतर्गत सन २०२३-२०२४ मध्ये मौजे घोडदे (ता. साकी) येथे घरकुल मंजुर झाले आहे. सदर घरकुलाचे झालेल्या बांधकामाचे फोटो काढुन तपासणी करुन त्याचे मुल्यांकन पंचायत समिती कार्यालयात सादर करण्यासाठी पंचायत समिती कार्यालय, येथील घरकुल विभागातील ग्रामीण गृह निर्माण अभियंता परेश प्रदिपराव शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी यांच्याकडे १ हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे कार्यालयात माहिती दिली.
त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधिक्षक अभिषेक पाटील यांनी या माहिती वरुन ला.प्र.विभागाच्या पथकाने मौजे घोडदे येथे तक्रारदार यांची भेट घेवून त्यांची तकार नोंदवून पडताळणी केली. या पडताळणी दरम्यान आरोपी शिंदे यांनी तक्रारदार यांचेकडे १ हजार रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम सुरत महामार्गावरील घोडदे गावाच्या सर्व्हिस रोडवरील बसस्थानकाजवळ त्यांचे कारमध्ये देण्यास सांगितले.
त्यानुसार पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रविण पाटील, मकरंद पाटील, प्रविण मोरे, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने सापळा लावला. तक्रारदार तरुण या ठिकाणी पैसे देण्यासाठी पोहोचला यावेळी पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडून स्विकारताना परेश प्रदिपराव शिंदेयांना रंगेहाथ पकडले. त्यांच्या विरुध्द साक्री पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Latest Marathi News धुळे : साक्री पंचायत समितीच्या अभियंत्याला बेड्या, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला यश Brought to You By : Bharat Live News Media.