चंद्रपूर : एटीएम मधून पैसे चोरणाऱ्या टोळीस अटक

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : शहरातील वेगवेगळया ठिकानावरील एटीएम मशीन मध्ये सिल्व्हर रंगाची पट्टी लावून पैसे चोरणाऱ्या टोळीला चंद्रपूर पोलीसांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी 14 एप्रिलला सायंकाळी पाच वाजताच सुमारास चंद्रपूर शहरातील सिंदी कॉलनी, दुर्गा माता मंदिर समोरील कॅनरा बँकेचे एटीएममध्ये पैसे काढण्याकरीता गेले असता अज्ञात इसमाने एटीएम मशिनला सिल्वर रंगाची … The post चंद्रपूर : एटीएम मधून पैसे चोरणाऱ्या टोळीस अटक appeared first on पुढारी.

चंद्रपूर : एटीएम मधून पैसे चोरणाऱ्या टोळीस अटक

चंद्रपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरातील वेगवेगळया ठिकानावरील एटीएम मशीन मध्ये सिल्व्हर रंगाची पट्टी लावून पैसे चोरणाऱ्या टोळीला चंद्रपूर पोलीसांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी 14 एप्रिलला सायंकाळी पाच वाजताच सुमारास चंद्रपूर शहरातील सिंदी कॉलनी, दुर्गा माता मंदिर समोरील कॅनरा बँकेचे एटीएममध्ये पैसे काढण्याकरीता गेले असता अज्ञात इसमाने एटीएम मशिनला सिल्वर रंगाची पट्टी लावुन लक्ष विचलीत करून ५ हजार रूपये चोरून नेली अशी तक्रार फिर्यादीने पोलीस स्टेशन, रामनगर येथे दाखल केली. सदर तक्रारीवरून  कलम ३७९ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासालां सुरुवात केली.
चंद्रपूर शहरातील वेगवेगळया ठिकाणी एटीएम मधील पैसे चोरीच्या घटना लक्षात घेता, पोलिस अधीक्षक यांचे मार्गदर्शनात  वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सुनिल गाडे, पोलीस स्टेशन, रामनगर यांचे मार्गदर्शनात गुन्हे शोध पथक, रामनगर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी रवाना होवुन परिसरातील सी.सी.टि.व्हि. फुटेज चेक केले. गोपनीय माहितीच्या आधारे  तांत्रिक पध्दतीने कौशल्यपुर्ण तपास करून आरोपी कार्तीक शंकर मामीडवार (वय २७) वर्ष रा. लालपेठ कॉलरी, बाबुपेठ चंद्रपूर तसेच दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेवुन गुन्हयातील फिर्यादी हिचे चोरून नेलेले पैसे जप्त करण्यात आले.
आरोपी तसेच विधी संघर्षग्रस्त बालकांना अधिक विचारपुस केले असता त्यांनी यापुर्वी चंद्रपुर शहरात अंदाजे ५-७ ठिकाणी एटीएम . मशिनला सिल्वर रंगाची पट्टी लावुन पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केला तसेच बल्लारशाह येथे सुध्दा पेपर मिलचे समोरील एटीएम मधुन पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींकडून पाच हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
नागरीकांना आवाहन
चंद्रपूर पोलीसांनी चंद्रपुर शहर तसेच जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन केले आहे. एटीएम मशिन मधिल पैसे निघण्याचे ठिकाणी सिल्वर रंगाची पट्टी लावुन पैसे अडकल्याचे भासवुन थोडया वेळानी सिल्वर रंगाची पट्टी काढुन पैसे चोरी करणारी टोळी सक्रीय झाली आहे. नागरीकानी सर्तक राहून असे प्रकार आढळून आल्यास पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी असे आवाहन चंद्रपूर पोलीसांनी केले आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागिय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल गाडे, पो. नि. यशवंत कदम तसेच गुन्हे शोध पथक, रामनगर पोलिसांनी केली आहे.
Latest Marathi News चंद्रपूर : एटीएम मधून पैसे चोरणाऱ्या टोळीस अटक Brought to You By : Bharat Live News Media.