बीफ कंपन्यांकडून भाजपला ५ हजार कोटींचे इलेक्ट्रिकल बॉण्ड : असदुद्दीन ओवेसी
छत्रपती संभाजीनगर : देशातील लोकशाही धनदांडग्याच्या हातात गेली आहे. देशाचे पंतप्रधान मांसाहार करण्यास एकीकडे विरोध करतात, तर दुसरीकडे भाजपने बीफ कंपन्यांकडून ५ हजार कोटी रुपयांचे इलेक्ट्रिकल बॉण्ड कसे घेतले, अशी घणाघाती टीका आज (दि.१५) एमआयएमचे अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवेसी यांनी केली.
लोकसभा निवडणुकीत एमआयएम उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात आयोजित सभेत ते बोलत होते. भाजप, काँग्रेस, शिवसेनासह सर्वच राजकीय पक्षांना इलेक्ट्रिकल बॉण्ड मिळाले आहे. मात्र आम्हीच जेम्स बॉण्ड असल्याने बॉण्ड घेतले नाही. एमआयएमचा मराठा, धनगर व मुस्लिम आरक्षणाला पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वाढती बेरोजगारी व महागाई, शेतकऱ्यांचे जीवन संपवणे यावर राज्यकर्ते बोलत नसल्याचा आरोप करत खा.इम्तियाज जलील यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नावर सभागृहात आवाज उठविल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा :
महामार्ग मंत्रालयात मोठा भ्रष्टाचार: पवन खेरा यांचा गडकरी यांच्यावर निशाणा
‘गुजरातचा विकास, निवडणूक रोखे, राममंदिर, ईडी हे देशासाठी…’ : पहा काय म्हणाले पीएम मोदी
Lok Sabha Elections | हवाई प्रचार केला, तरीही खासदारकीने अंगठा दाखवला
Latest Marathi News बीफ कंपन्यांकडून भाजपला ५ हजार कोटींचे इलेक्ट्रिकल बॉण्ड : असदुद्दीन ओवेसी Brought to You By : Bharat Live News Media.