सिडनी हादरले..! तीन दिवसांमध्ये पुन्हा चाकू हल्ल्याचा प्रकार, अनेक जखमी
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात मॉलमध्ये माथेफिरुने केलेल्या चाकू हल्ला आणि त्यानंतर झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच पुन्हा चर्चेमध्ये चाकू हल्लाचा प्रकार घडला आहे. सिडनी वेस्ट येथील वेकले येथील चर्चमध्ये प्रवचन समारंभात एका बिशपसह इतर अनेकांवर चाकूने वार करण्यात आल्याचे वृत्त ‘रॉयटर्स’ने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे.
सिडनी शहराच्या पश्चिम भागात वेकले येथील चर्च आहे. सायंकाळी चर्चमध्ये प्रवचन समारंभाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी माथेफिरुने एका बिशपसह इतर अनेकांवर चाकूने वार केले. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, चर्चमध्ये हे प्रवचन ऑनलाइन स्ट्रीम केले जात होते. प्रवचनावरील लाइव्ह स्ट्रीम केलेल्या व्हिडिओमध्ये गडद कपडे घातलेला एक माणूस बिशप यांच्यावर चाकू हल्ला करताना त्यांच्याजवळ जाताना दिसतो. त्याला राेखण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करतात. यानंतर भयानक किंकाळ्या ऐकू येतात.
चर्चमध्ये माथेफिरुने अनेक लोकांवर वार करण्यात आल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. जखमी लोकांना जीवघेण्या जखमा झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णवाहिका पॅरामेडिक्सकडून उपचार केले जात आहेत,” पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे.
Several injured in Sydney in the second stabbing incident in three days https://t.co/oCuOSXh0IX pic.twitter.com/r0sEWgbr2M
— Reuters (@Reuters) April 15, 2024
सिडनी मॉलमध्ये माथेफिरुने केला होता चाकूहल्ला
तीन दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात मॉलमध्ये माथेफिरुने केलेल्या चाकूहल्ल्यात ६ जण ठार झाले होते. आहेत. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हल्लेखोरही ठार झाला होता. सिडनी शहरातील गजबजलेल्या वेस्टफिल्ड बोंडी जंक्शन शॉपिंग सेंटरमध्ये चाकू घेऊन आलेल्या व्यक्तीने अचानक अनेकांवर हल्ला केला. यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी केलेल्या कारवाईत हल्लेखोर ठार झाला आहे. उपचार सुरु असताना या हल्ल्यातील पाच जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना पुन्हा एकदा चाकू हल्ल्याचा प्रकार घडल्याने सिडनी शहरात प्रचंड दहशत पसरली आहे.
Latest Marathi News सिडनी हादरले..! तीन दिवसांमध्ये पुन्हा चाकू हल्ल्याचा प्रकार, अनेक जखमी Brought to You By : Bharat Live News Media.