जालना : अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरणी आरोपी ऋषिकेश बेदरेला अटक

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या राड्यानंतर लाठीचार्ज आणि दगडफेकीची घटना घडली होती. या दगडफेकीच्या घटनेतील आरोपी पैकी ऋषिकेश बेदरेला अंबड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आरोपी बेदरेकडून एक गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आल्याने जिल्हयात एकच खळबळ उडाली आहे. अंतरवली सराटी येथील उपोषण … The post जालना : अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरणी आरोपी ऋषिकेश बेदरेला अटक appeared first on पुढारी.
#image_title

जालना : अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरणी आरोपी ऋषिकेश बेदरेला अटक

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या राड्यानंतर लाठीचार्ज आणि दगडफेकीची घटना घडली होती. या दगडफेकीच्या घटनेतील आरोपी पैकी ऋषिकेश बेदरेला अंबड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आरोपी बेदरेकडून एक गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आल्याने जिल्हयात एकच खळबळ उडाली आहे.
अंतरवली सराटी येथील उपोषण स्थळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या राड्यानंतर लाठीचार्ज आणि दगडफेकीची घटना घडली. या दगडफेकीच्या घटनेतील आरोपी ऋषिकेश बेदरे सह दोघांना अंबड पोलिसांकडून शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली आहे. अंतरवाली सराटीच्या घटनेनंतर ऋषिकेश बेदरे व इतरांवर गोंदी पोलीस ठाण्यात कट रचून जीवे मारण्याच्या उद्देशाने दगडफेक केल्या प्रकरणी कलम ३०७ अन्वये,गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस त्याचा शोध घेत असताना तो इतर दोन साथीदारांसह आढळून आला. दरम्यान पोलीस आता त्याची कसून चौकशी करत आहेत.रात्री अंबड पोलीस ठाण्या बाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
अंबड पोलीसांनी शनिवारी सकाळी ऋषिकेश बेदरे व त्याचे साथीदार शनीदेव सिरसाट आणि कैलास सुरवसे या तिघांना अंबडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. यावेळी ऋषिकेश सह त्याच्या दोन्ही साथीदाराला २ डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. उपोषणादरम्यान मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्यामुळे वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी पोलीस घेऊन जात होते. त्यावेळी आंदोलकांनी पोलिसांशी हुज्जत घालून जरांगे पाटील यांना रुग्णालयात घेवून जाण्यास प्रतिकार करून पोलिसांवर दगडफेक करून पोलिसांना गंभीर जखमी केले होते.तसेच पोलिसांची एक कार जाळून टाकली असे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते.पोलीस उपनिरीक्षक गणेश राऊत यांच्या फिर्यादीवरून २ सप्टेंबर रोजी गोंदी पोलिस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस उपनिरीक्षक गणेश राऊत यांच्या फिर्यादीवरून ऋषिकेश बेंद्रे, श्रीराम कुरणकर, राजू कुरणकर, संभाजी बेंद्रे, महारुद्र अंबरुळे, राजेंद्र कोटुंबे, भागवत तारख, दादा घाडगे, पांडुरंग तारख, अमोल पंडित, किरण तारक, अमोल लहाने, वैभव आवटे, किशोर कटारे, अविनाश मांगदरे, मयूर आवटे यांच्यासह ३०० ते ३५० आंदोलकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासर्व आंदोलकांवर भादंवि. ३०७, ३३३, ३३२, ३५३, ४२७, ४३५, १२० (ब), १४३, १४७, १४८, १४९ मुंबई पोलीस कायद्याचे कलम १३५ आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
The post जालना : अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरणी आरोपी ऋषिकेश बेदरेला अटक appeared first on पुढारी.

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या राड्यानंतर लाठीचार्ज आणि दगडफेकीची घटना घडली होती. या दगडफेकीच्या घटनेतील आरोपी पैकी ऋषिकेश बेदरेला अंबड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आरोपी बेदरेकडून एक गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आल्याने जिल्हयात एकच खळबळ उडाली आहे. अंतरवली सराटी येथील उपोषण …

The post जालना : अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरणी आरोपी ऋषिकेश बेदरेला अटक appeared first on पुढारी.

Go to Source