१४% प्रोटीन सप्लेमेंटमध्ये कीटकनाशक तर ७०% कंपन्यांकडून दिशाभूल
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : जीममध्ये जाऊन शरीर कमावण्यासाठी अनेक युवक प्रोटीन सप्लेमेंट घेत असतात. पण या प्रोटीन सप्लेमेंटबद्दल एक महत्त्वाची बातमी पुढे आलेली आहे. भारतातील ७० टक्के प्रोटीन सप्लेमेंट कंपन्या दिशाभूल करणारी माहिती देतात असे दिसून आले आहे. शिवाय १४ टक्के प्रोटीन सप्लेमेंटमध्ये विषारी घटक आढळून आले आहेत. (Protein Powder)
भारतात विक्री होत असलेल्या ३६ प्रोटीन सप्लेमेंटचा अभ्यास करून हे निष्कर्ष काढण्यात आलेले आहेत. हा रिसर्च पेपर मेडिसिन या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. या निष्कर्षांनंतर प्रोटीन सप्लेमेंटची गुणवत्ता आणि सुरक्षितता यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहेत.
बॉडीबिल्डर, व्यायामपटू, खेळाडू तसेच ज्यांना सोप्या पद्धतीने प्रोटीन घ्यायचे आहे, ते प्रोटीन सप्लेमेंट घेतात. भारतात प्रोटीन सप्लेमेंटची बाजारपेठ काही हजार करोडची आहे. केरळमधील राजागिरी हॉस्पिटलने हे संशोधन प्रसिद्ध केले आहे. (Protein Powder)
संशोधनातील निष्कर्ष | Protein Powder
या संशोधनात असे दिसून आले आहे की प्रोटीन सप्लेमेंट बनवणाऱ्या कंपन्या जे दावे करतात ते दिशाभूल करणारे असतात. सप्लेमेंटच्या डब्यावर जे लेबल असते त्यातील माहिती दिशाभूल करणारी असते, असे यात म्हटले आहे. यापेक्षाही गंभीर प्रकार म्हणजे १४ टक्के प्रोटीन सप्लेमेंटमध्ये विषारी घटक असतात. या विषारी घटकांत अफ्लटॉक्सिन या बुरशीजन्य घटकाचा समावेश आहे. तर ८ टक्के प्रोटीन सप्लेमेंटमध्ये कीटकनाशकांचे प्रमाण मिळून आले आहेत.
या संशोधन करताना पूर्ण वनस्पतीजन्य, व्हे प्रोटीन आणि ब्लेंडेड प्रोटीन अशा तिन्ही प्रकारच्या प्रोटीनचा अभ्यास करण्यात आला. कंपन्या लेबलवर सप्लेमेंटममध्ये किती टक्के प्रोटीन आहे, याची माहिती देतात. पण माहिती दिशाभूल करणारी असल्याचे दिसून आले आहे. दावा करण्यात आलेल्या प्रोटीनच्या प्रमाणापेक्षा ४० ते ६० टक्के प्रोटीन कमी असल्याचे दिसून आले आहे.
हेही वाचा
Protein foods : प्रोटीनची कमतरता पूर्ण करण्यासाठी ‘या’ गोष्टींचा करा दररोजच्या आहारात समावेश
सावधान..! भारतात फेअरनेस क्रीमच्या वापरामुळे किडनीच्या समस्यांमध्ये वाढ : जाणून घ्या नवीन संशोधन
बुरशी संक्रमणापासून ‘या’ प्रोटिनमुळे सुरक्षित असतात मगरी
Latest Marathi News १४% प्रोटीन सप्लेमेंटमध्ये कीटकनाशक तर ७०% कंपन्यांकडून दिशाभूल Brought to You By : Bharat Live News Media.