के. कविता याच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: बीआरएस नेत्या के. कविता यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अंतरिम जामीन मागितला होता. यासाठी त्यांनी दिल्ली राऊस एव्हेन्यू न्यायालयाकडे अर्ज केला होता. दरम्यान न्यायालयाने के.कविता यांच्या अंतरिम जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली आहे. त्यांच्या अंतरिम जामिनावर सोमवार २२ एप्रिल रोजी सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने आज (दि.१५) स्पष्ट केले. दरम्यान आजच्या सुनावणीत दिल्ली सत्र न्यायालयाने के.कविता यांची न्यायालयीन कोठडीत मंगळवार २३ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. (K. Kavita)
दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने उत्पादन शुल्क धोरण प्रकरणाशी संबंधित सीबीआय खटल्याच्या संदर्भात बीआरएस (BRS) नेते के कविता यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावर केंद्रीय अन्वेषण ब्यूरोला (CBI) न्यायालयाने नोटीस बजावली होती. पुढे आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 22 एप्रिल रोजी निश्चित केली आहे. (K. Kavita)
के. कविता यांनी याचिकेद्वारे अंतरिम दिलासा मागताना म्हटले आहे की, त्यांच्या भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) तिला लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी त्यांची ‘स्टार प्रचारक’ म्हणून घोषित केले आहे .यासाठी तिला शनिवार २० एप्रिल ते ११ मे या कालावधीत निवडणूक ड्युटी निर्धारित केली आहे, त्यामुळे निवडणुक प्रचारासाठी अर्ज करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (K. Kavita)
The Rouse Avenue Court of Delhi issued notice to the Central Bureau of Investigation (CBI) on the bail plea moved by BRS (BRS) leader K Kavitha in connection with the CBI case related to the Excise Policy case. The Court has fixed April 22, for hearing the matter.
Kavitha…
— ANI (@ANI) April 15, 2024
#BREAKING
Delhi Court seeks CBI’s response on interim bail plea moved by BRS leader K Kavitha in the liquor policy case.
Kavitha has sought interim bail for campaigning in the Lok Sabha polls.
Court listed the matter for hearing on April 22.
— Live Law (@LiveLawIndia) April 15, 2024
हेही वाचा:
K Kavitha | केजरीवाल, दक्षिणेतील मद्यविक्रेता आणि के. कविता यांचा संबंध काय? CBI ने केला खळबळजनक दावा
K Kavitha News: के. कविता यांना दिलासा नाहीच, जामीन अर्जावरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला
K Kavitha News: ‘हे मनी लॉन्ड्रिंग नाही तर राजकीय लॉन्ड्रिंग’; के. कविता यांचा सत्ताधारी, ईडीवर हल्लाबोल
The post के. कविता याच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली appeared first on Bharat Live News Media.
