मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थित महायुती उमेदवार संजय मंडलिक, धैर्यशील मानेंचे शक्तीप्रदर्शन

पुढारी ऑनलाईन डेस्क: आगामी लोकसभा निवडणुक २०२४ साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीच्या उमेदवारांचा आज (दि.१५) अर्ज दाखल करतेवेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून संजय मंडलिक आणि हातकणंगले मतदार संघातून धैर्यशील माने यांनी महायुतीकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी महायुतीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. अर्ज भरण्यासाठी उमेदवारांसमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री … The post मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थित महायुती उमेदवार संजय मंडलिक, धैर्यशील मानेंचे शक्तीप्रदर्शन appeared first on पुढारी.

मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थित महायुती उमेदवार संजय मंडलिक, धैर्यशील मानेंचे शक्तीप्रदर्शन

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: आगामी लोकसभा निवडणुक २०२४ साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीच्या उमेदवारांचा आज (दि.१५) अर्ज दाखल करतेवेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून संजय मंडलिक आणि हातकणंगले मतदार संघातून धैर्यशील माने यांनी महायुतीकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी महायुतीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. अर्ज भरण्यासाठी उमेदवारांसमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक हे देखील उपस्थित होते. (Lok Sabha Election 2024)
गांधी मैदान, महाद्वार रोड, शिवाजी चौक, सीपीआर चौक ते खानविलकर पेट्रोल पंप या महामार्गावर महायुतीची रॅली काढण्यात आली आहे. अर्ज भरण्यासाठी महायुतीच्या सर्व पक्षांचे आजी-माजी मंत्री, खासदार, आमदार आणि प्रमुख नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी  ‘अब की बार चारसो पार’चा नारा देत नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी संजय मंडलिक व धैर्यशील माने यांना पाठबळ देऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. (Lok Sabha Election 2024)

# Live📡| 15-04-2024
📍 कोल्हापूर
🎥 कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा | महायुती उमेदवारांची उमेदवारी अर्ज दाखल रॅली
https://t.co/97gHyYncF4
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 15, 2024

हेही वाचा:

कोल्हापूर : मंडलिक व माने हेच उमेदवार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर : पाठिंबा देताना प्रतिगामी नव्हतो का? : संजय मंडलिक

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय गृहकलहाला उधाण!

 
Latest Marathi News मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थित महायुती उमेदवार संजय मंडलिक, धैर्यशील मानेंचे शक्तीप्रदर्शन Brought to You By : Bharat Live News Media.