लोकसभा मतदानापूर्वीच पैशाचा पाऊस! ४,६५० कोटी रुपये जप्त

पुढारी ऑनलाईन : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ मार्चपासून दररोज १०० कोटी रुपये जप्त होत असल्याची माहिती भारतीय निवडणूक आयोगाने दिली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू होण्यापूर्वीच त्यांच्या अधिकाऱ्यांनी ४,६५० कोटी रुपये जप्त केले आहेत आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या एकूण जप्त रकमेपेक्षा ही अधिक रक्कम आहे, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे. “सार्वत्रिक निवडणुका … The post लोकसभा मतदानापूर्वीच पैशाचा पाऊस! ४,६५० कोटी रुपये जप्त appeared first on पुढारी.

लोकसभा मतदानापूर्वीच पैशाचा पाऊस! ४,६५० कोटी रुपये जप्त

Bharat Live News Media ऑनलाईन : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ मार्चपासून दररोज १०० कोटी रुपये जप्त होत असल्याची माहिती भारतीय निवडणूक आयोगाने दिली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू होण्यापूर्वीच त्यांच्या अधिकाऱ्यांनी ४,६५० कोटी रुपये जप्त केले आहेत आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या एकूण जप्त रकमेपेक्षा ही अधिक रक्कम आहे, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
“सार्वत्रिक निवडणुका २०२४ दरम्यान जप्त केलेली रक्कम ही देशातील लोकसभा निवडणुकीच्या ७५ वर्षांच्या इतिहासात नोंदवलेली सर्वाधिक रक्कम होण्याच्या मार्गावर आहे,” असे निवडणूक आयोगाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.
१८ व्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू होण्यापूर्वीच ४,६५० कोटी रुपयांची रक्कम जप्त केली आहे.
Latest Marathi News लोकसभा मतदानापूर्वीच पैशाचा पाऊस! ४,६५० कोटी रुपये जप्त Brought to You By : Bharat Live News Media.