कोल्हापूर : पंचगंगा साखर कारखान्याचा मोठा निर्णय; प्रतिटन ऊसाला मिळणार ३३०० रुपये दर

कबनूर; पुढारी वृत्तसेवा : येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना लिज युनिट श्री रेणुका शुगर्स लि. या कारखान्याने चालू वर्षीचा २०२३-२४ गळीत हंगामातील ऊसाला विनाकपात रु. ३३००/- असा उच्चांकी प्रतिटन दर जाहीर केला आहे.
कारखान्याचे चेअरमन पी. एम. पाटील म्हणाले, श्री रेणुका शुगर्सने चालू गळीत हंगामात गळीतास येणाऱ्या ऊसाला प्रतिटन रु. ३३००/- देण्यास मंजूरी दिली आहे. हा दर राज्यातील व कारखान्याच्या इतिहासातील उच्चांकी दर आहे. कारखान्याने दरवर्षी उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम राखली आहे. चालू वर्षी गळीत हंगामाचा कालावधी कमी आहे. तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस कारखान्यास पाठवून सहकार्य करावे असे आवाहनही चेअरमन पाटील यांनी यावेळी केले.
यावेळी रेणुका शुगर्सचे कार्यकारी संचालक केन एस. बी. नेर्लीकर, सिनि. जनरल मॕनेंजर केन मुगळखोड, डे. जनरल मॕनेंजर केन सी. एस. पाटील, केन मॕनेंजर एन. टी. बन्ने, संचालक धनगोंडा पाटील, एम. आर. पाटील, प्रमोद पाटील, प्र. का. संचालक नंदकुमार भोरे आदि उपस्थित होते.
The post कोल्हापूर : पंचगंगा साखर कारखान्याचा मोठा निर्णय; प्रतिटन ऊसाला मिळणार ३३०० रुपये दर appeared first on पुढारी.
कबनूर; पुढारी वृत्तसेवा : येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना लिज युनिट श्री रेणुका शुगर्स लि. या कारखान्याने चालू वर्षीचा २०२३-२४ गळीत हंगामातील ऊसाला विनाकपात रु. ३३००/- असा उच्चांकी प्रतिटन दर जाहीर केला आहे. कारखान्याचे चेअरमन पी. एम. पाटील म्हणाले, श्री रेणुका शुगर्सने चालू गळीत हंगामात गळीतास येणाऱ्या ऊसाला प्रतिटन रु. ३३००/- देण्यास …
The post कोल्हापूर : पंचगंगा साखर कारखान्याचा मोठा निर्णय; प्रतिटन ऊसाला मिळणार ३३०० रुपये दर appeared first on पुढारी.
