कर्जाचा डोंगर करून सतत पैशांची करायची मागणी; पतीने काढला काटा

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : कर्जाचा डोंगर करून ते फेडण्यासाठी सतत पैशांची मागणी करणाऱ्या पत्नीचा पतीने काटा काढला. खून केल्यानंतर पती स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला. ही घटना स्वागत नगर ताई चौक परिसरातील वीटभट्टीजवळ रविवारी (दि.१४) रात्री सव्वादहाच्या सुमारास घडली. यासीन सैफन शेख (वय ४०, रा. पाथरुट चौक, सोलापूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर … The post कर्जाचा डोंगर करून सतत पैशांची करायची मागणी; पतीने काढला काटा appeared first on पुढारी.

कर्जाचा डोंगर करून सतत पैशांची करायची मागणी; पतीने काढला काटा

सोलापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : कर्जाचा डोंगर करून ते फेडण्यासाठी सतत पैशांची मागणी करणाऱ्या पत्नीचा पतीने काटा काढला. खून केल्यानंतर पती स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला. ही घटना स्वागत नगर ताई चौक परिसरातील वीटभट्टीजवळ रविवारी (दि.१४) रात्री सव्वादहाच्या सुमारास घडली. यासीन सैफन शेख (वय ४०, रा. पाथरुट चौक, सोलापूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर सैफन मोदीन शेख (वय ४९, रा. किरण नगर, स्वागत नगरजवळ, नई जिंदगी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याने स्वतः दिलेल्या फिर्यादीवरुन खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफन याची तीन लग्न झाली आहेत. यास्मीन ही सैफनची पहिली पत्नी होती. घरगुती कारणावरुन यास्मीन सैफनला सोडून गेली होती. काही दिवसांपूर्वी ती पुन्हा परत आली होती. त्यांना २१ वर्षाची मुलगी आहे. मुलीच्या लग्नाबाबत चर्चा सुरु होती. यास्मीनला दारुचे व्यसन होते. तसेच तिने कर्जही घेतले होते. कर्ज फेडण्यासाठी यासीन नेहमी सैफनकडे पैशांची मागणी करत होती. पत्नीकडून होणार्‍या मानसिक त्रासाला तो कंटाळला होता. त्याने रविवारी रात्री चाकूने भोकसून, वार करुन तिचा खून केला. तिचा मृत्यू झाल्यानंतर खूनात वापरलेला चाकू घेवून तो एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर झाला. या प्रकरणाचा सहायक पोलिस निरीक्षक चंदनशिवे तपास करीत आहेत.
पत्नीने दिली होती धमकी!
यास्मीन हिने पती सैफन याला, मला तू ७० हजार रुपये कधी देणार आहेस, मला देणेकर्‍यांचे वारंवार फोन येत आहेत. पैसे दिले नाहीस तर तुझ्या घरच्यांना सोडणार नाही, अशी धमकी दिली. तसेच सैफन याच्या कानाखाली मारली. त्यावर सैफन याने कंबरेला खोचून ठेवलेला चाकू काढला आणि तिच्या पोटावर आणि मानेवर वार केले. तसेच दोन्ही हातांच्या मनगटांच्या नसा कापल्या.
हेही वाचा : 

सोलापूर : टेंभुर्णी बस स्थानकावर बहिणीच्या वास्तुशांती कार्यक्रमास आलेल्या पुण्यातील महिलेचे दागिने लंपास
सोलापूर : ऊस तोड मजुरांच्या ट्रॅक्‍टरला ट्रकची धडक; ४ जण ठार
सोलापूर: ढोकरी येथे अवैध वाळू उपसाप्रकरणी मोठी कारवाई; ६६ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

Latest Marathi News कर्जाचा डोंगर करून सतत पैशांची करायची मागणी; पतीने काढला काटा Brought to You By : Bharat Live News Media.