Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या अपार्टमेंटवर गोळीबाराचा कट हा अमेरिकत रचला होता, त्यासाठी लॉरेन्स बिश्नोई टोळीतील प्रमुख अनमोल बिश्नोई आणि रोहित गोदारा या दोघांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे वृत्त आहे. अनमोल बिश्नोई हा लॉरेन्सचा भाऊ असून त्याने फेसबुक पोस्ट करून या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. (Lawrence Bishnoi vs Salman khan)
रविवारी पहाटे ५ वाजता मुंबईतल वांद्रे येथील गॅलक्झी अपार्टमेंटवर गोळीबार करण्यात आला. याच अपार्टमेंटमध्ये सलमान राहातो. गोळीबार करणारे दोघे युवक दुचाकीवरून आले होते. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार दोघे बिश्नोई टोळीसाठी कार्यरत आहेत. बिश्नोई टोळीचा म्होरक्या लॉरेन्स तिहार जेलमध्ये आहे. त्याच्यावर खुनाचे गंभीर आरोप आहेत.
असा रचला कट | Lawrence Bishnoi vs Salman khan
NDTVने दिलेल्या माहितीनुसार अनमोल बिश्नोई याने गोळीबार घडवून आणण्याची जबाबदारी शुटर रोहित गोदारा याला दिली होती. रोहित हा अमेरिकेत राहातो, आणि रोहितचे भारतातील जवळपास सर्व राज्यांत नेटवर्क आहे. रोहितच्या नेटवर्कमध्ये शुटर्स आणि शस्त्रास्त्रे पुरवणारे आहेत. रोहितच्या नेटवर्कमध्ये राज्यातील विविध भागात शस्त्रास्त्रे पुरवू शकणारी यंत्रणा असून यांच्याकडे पिस्तुल, रायफल अशी शस्त्रे उपलब्ध असतात. गोळीबार करणाऱ्या शुटर्समध्ये विशाल उर्फ काळू हे एक नाव पुढे आले आहे. काळू आणि अन्य एका साथीदाराने रायगडमधून सेकंड हँड दुचाकी विकत घेतली आणि पनवेल येथून ते बाईक चालवत गॅलक्सी अपार्टमेंटपर्यंत आले. हा दुचाकी कोणी विकली याबद्दल पोलिस चौकशी सुरू आहे. (Lawrence Bishnoi vs Salman khan)
अनमोल बिश्नोई याने ज्या फेसबुक पेजवरून हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे, त्याचा आयपी कॅनडाचा आहे. पण पोलिसांचा कयास आहे, की व्हीपीएन वापरून हे पेज वापरले गेले असेल. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाब या पाच राज्यातील पोलिस या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
सलमान खानची सुरक्षा व्यवस्था | Lawrence Bishnoi vs Salman khan
लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर असणाऱ्या १० जणांत सलमान खानचे नाव आघाडीवर आहे. १९९९ला सलमान खानने काळविटाची शिकार केल्याने बिश्नोई समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, त्यामुळे लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर सलमान खान आहे. मुंबई पोलिसांनी सलमान खानला वाय प्लस सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे. सलमान खानच्या सुरक्षेसाठी ११ सुरक्षा कर्मचारी असतात, यात दोन खासगी सुरक्षारक्षक आहेत. सलमान खानच्या कार सोबत दोन सुरक्षा कारही असतात. तर सलमान खानची कारही पूर्णपणे बुलेट प्रुफ आहे.
हेही वाचा
मुंबई : सलमान खानच्या घरावर गोळीबारामागे बिष्णोई टोळीच; संशयिताची पोलिसांकडून चौकशी सुरु
गोळीबार प्रकरणानंतर राज ठाकरे सलमान खानच्या भेटीला
Salman Khan : गोळीबारानंतर सलमान खानशी मुख्यमंत्र्यांची फोनवरून चर्चा
Latest Marathi News ‘भाईजान’च्या घरावर गोळीबाराचा कट ‘असा’ रचला Brought to You By : Bharat Live News Media.