हॉटेलच्या उद्घाटनासाठी चक्क पुणे-सातारा सेवा रस्ताच बंद

खेड शिवापूर; पुढारी वृत्तसेवा : पुणे-सातारा सेवा रस्त्यावरील एका हॉटेलच्या उद्घाटनप्रसंगी चक्क कोंढणपूर फाट्याजवळील सेवा रस्ताच शनिवारी (दि. २५) दुपारी चारनंतर बंद करण्याचा पराक्रम करण्यात आला. यामुळे स्थानिकांसह पुण्याकडे जाणाऱ्या नागरिकांचे तसेच दवाखान्यात जाणाऱ्यांचे हाल झाले. रात्री आठ ते साडेआठपर्यंत रस्ता बंदच असल्याचे दिसून आले. पुणे-सातारा रस्त्यावरील कोंढणपूर फाट्याजवळ एका हॉटेलचा उद्घाटन समारंभ शनिवारी आयोजित … The post हॉटेलच्या उद्घाटनासाठी चक्क पुणे-सातारा सेवा रस्ताच बंद appeared first on पुढारी.
#image_title

हॉटेलच्या उद्घाटनासाठी चक्क पुणे-सातारा सेवा रस्ताच बंद

खेड शिवापूर; पुढारी वृत्तसेवा : पुणे-सातारा सेवा रस्त्यावरील एका हॉटेलच्या उद्घाटनप्रसंगी चक्क कोंढणपूर फाट्याजवळील सेवा रस्ताच शनिवारी (दि. २५) दुपारी चारनंतर बंद करण्याचा पराक्रम करण्यात आला. यामुळे स्थानिकांसह पुण्याकडे जाणाऱ्या नागरिकांचे तसेच दवाखान्यात जाणाऱ्यांचे हाल झाले. रात्री आठ ते साडेआठपर्यंत रस्ता बंदच असल्याचे दिसून आले.
पुणे-सातारा रस्त्यावरील कोंढणपूर फाट्याजवळ एका हॉटेलचा उद्घाटन समारंभ शनिवारी आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी आयोजकांनी सेवा रस्त्यावर बाऊन्सर थांबवून सेवा रस्ताच बंद केला होता. त्यामुळे पीएमपीएमएलने आलेल्या सामान्य नागरिकांना खेड शिवापूरपासून पायी चालत कोंढणपूर फाट्यावर यावे लागले. विशेष म्हणजे कोंढणपूर फाट्यापासून सिंहगडापर्यंत असणाऱ्या गावातील नागरिकांना जायचे कसे? हा प्रश्न उपस्थित झाला होता. पीएमपीएमएल चालकाने रस्ता बंद असल्याने काही महिलांना खेड-शिवापूरजवळ उतरविले. परिणामी, त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या, तर दुसरीकडे आजपर्यंत पहिल्यांदाच पीएमपीएमएल बस उड्डाणपुलावरून गेल्याचे दिसून आले. केवळ पीएमपीएमएल बसच नव्हे तर एसटी महामंडळाच्या बसदेखील यावेळी उड्डाणपुलावरून गेल्या.
सेवा रस्ता बंद केल्यामुळे या भागात असलेल्या चार दवाखान्यांत जाणारी वाहतूक बंद झाली होती. याबाबतचे गांभीर्य पोलिसांसह आयोजकांना नव्हते, हे प्रामुख्याने दिसून आले. मुळात सेवा रस्ता बंद करणे हा गुन्हा आहे. तसेच या रस्त्याचा वापर करणाऱ्या नागरिकांचे हाल होणार आहे हे आयोजकांना का समजले नाही? या दरम्यान एखादी दुर्घटना घडल्यास त्यास कोण जबाबदार ? असे अनेक प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केले जात होते. याबाबत स्थानिक पोलिस फक्त बघ्याची भूमिका घेत होते.
स्टेज टाकून लावणीचा कार्यक्रम
हॉटेलच्या उद्घाटनावेळी येणारे पाहुणे आणि इतरांसाठी तेथे लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे सेवा रस्ता बंद करून तेथे भव्य स्टेज उभारण्यात आला आणि लावणीचा कार्यक्रम सादर करण्यात आला.
संबंधित ठिकाणी सेलिब्रिटी येणार आहेत. थोडा वेळ सेवा रस्ता बंद करून तो पुन्हा सुरू करणार आहे.
– अण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक, राजगड.

The post हॉटेलच्या उद्घाटनासाठी चक्क पुणे-सातारा सेवा रस्ताच बंद appeared first on पुढारी.

खेड शिवापूर; पुढारी वृत्तसेवा : पुणे-सातारा सेवा रस्त्यावरील एका हॉटेलच्या उद्घाटनप्रसंगी चक्क कोंढणपूर फाट्याजवळील सेवा रस्ताच शनिवारी (दि. २५) दुपारी चारनंतर बंद करण्याचा पराक्रम करण्यात आला. यामुळे स्थानिकांसह पुण्याकडे जाणाऱ्या नागरिकांचे तसेच दवाखान्यात जाणाऱ्यांचे हाल झाले. रात्री आठ ते साडेआठपर्यंत रस्ता बंदच असल्याचे दिसून आले. पुणे-सातारा रस्त्यावरील कोंढणपूर फाट्याजवळ एका हॉटेलचा उद्घाटन समारंभ शनिवारी आयोजित …

The post हॉटेलच्या उद्घाटनासाठी चक्क पुणे-सातारा सेवा रस्ताच बंद appeared first on पुढारी.

Go to Source