राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकार्यांकडून तपासणी

पुढार ऑनलाईन डेस्क : निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तामिळनाडूतील निलगिरीमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली.
या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी सांगितले की, राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टर निलगिरी येथे उतरले. यावेळी निवडणूक आयोगाच्या उड्डाण पथकाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. राहुल गांधी हे केरळमधील त्यांच्या संसदीय मतदारसंघ वायनाड येथे जात होते, जिथे ते सार्वजनिक रॅलींसह अनेक निवडणूक प्रचारात भाग घेण्यापूर्वी हा प्रकार घडला.
राहुल गांधी यांच्याव्यतिरिक्त, निवडणूक अधिकाऱ्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र व मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या हेलिकॉप्टरचीही तपासणी केली, तामिळनाडू आणि केरळ राज्यांमध्ये प्रचाराची रणधुमाळी चेगावली आहे. राज्यांमध्ये अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका होणार आहेत. राहुल गांधी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
हेही वाचा :
Lok Sabha Elections 2024 | किस्से निवडणुकीचे : कालचे विरोधक, आज प्रचारक
Lok Sabha Elections 2024 : पीएम नरेंद्र मोदींच्या हस्ते भाजपच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन
Lok Sabha Election 2024 : ‘तृणमूल’च्या कार्यकर्त्यासोबत अधीर रंजन यांचा ‘राडा’, व्हिडिओ व्हायरल
The post राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकार्यांकडून तपासणी appeared first on Bharat Live News Media.
