अर्थवार्ता

* भारताची विदेश चलन गंगाजळी 5 एप्रिल रोजी संपलेल्या सप्ताहात सुमारे 3 अब्ज डॉलर्सनी वधारून 648.6 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. मागील सलग 7 सप्ताहात गंगाजळीत वाढ नोंदवली जात आहे. गंगाजळीतील वाढ ही प्रामुख्याने सोन्याच्या साठ्यामध्ये झालेल्या वाढीमुळे पाहायला मिळाली. सोन्याच्या साठ्याची किंमत तब्बल 2.4 अब्ज डॉलर्सनी वाढली. मागील दोन महिन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात चीन आणि भारत यांसारख्या … The post अर्थवार्ता appeared first on पुढारी.

अर्थवार्ता

* भारताची विदेश चलन गंगाजळी 5 एप्रिल रोजी संपलेल्या सप्ताहात सुमारे 3 अब्ज डॉलर्सनी वधारून 648.6 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. मागील सलग 7 सप्ताहात गंगाजळीत वाढ नोंदवली जात आहे. गंगाजळीतील वाढ ही प्रामुख्याने सोन्याच्या साठ्यामध्ये झालेल्या वाढीमुळे पाहायला मिळाली. सोन्याच्या साठ्याची किंमत तब्बल 2.4 अब्ज डॉलर्सनी वाढली. मागील दोन महिन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात चीन आणि भारत यांसारख्या देशांसोबतच युरोपमधील देशांनीदेखील सोन्याचा साठा वाढवण्यावर भर दिला. युक्रेन आणि रशियामधील ताणलेले युद्ध तसेच मध्यपूर्व भागातील इस्रायलची युद्धजन्य परिस्थिती यामुळे बहुतांश देशांनी हेजिंग (Hedging) च्या द़ृष्टीने सोन्याचा साठा वाढवण्यावर भर दिला. त्याचप्रमाणे मागील दोन वर्षांमध्ये जगात महागाई वाढल्याने सर्व देशांच्या मध्यवती बँकांनी आपापल्या देशातील व्याजदर चढे ठेवले. त्यामुळे मंदीपासून संरक्षण करण्यासाठी बहुतांश देशांनी सोन्याचा साठा वाढवून आपल्या देशाची गंगाजळी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला. भारतानेदेखील सप्टेंबर 2021 नंतर प्रथमच पुन्हा एकदा 642 अब्ज डॉलर्स परकीय गंगाजळीचा विक्रमी टप्पा नुकताच मोडीत काढला.
* गतसप्ताहात अखेरच्या म्हणजेच शुक्रवारच्या सत्रात निफ्टी व सेन्सेक्समध्ये अनुक्रमे एकूण 234.40 अंक व 793.25 अंकांची घसरण होऊन दोन्ही निर्देशांक 22519.4 अंक व 74244.9 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये अखेरच्या दिवशी 1.03 टक्के, सेन्सेक्समध्ये 1.06 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. एकूण सप्ताहाचा विचार केला असता निफ्टी 5.70 अंक वाढला, तर सेन्सेक्स 3.32 अंक घटला. या सप्ताहात प्रथमच सेन्सेक्सने गुरुवारच्या सत्रात आजपर्यंतच्या सर्वाधिक विक्रमी पातळीवर म्हणजेच 75038 अंकांवर बंदभाव दिला. सप्ताहादरम्यान सेन्सेक्सने 75124.28 अंकांची विक्रमी पातळी गाठली. परंतु, सप्ताहाअखेर गुंतवणूकदारांनी नफा घेऊन बाहेर पडल्यास (प्रॉफिट बुकिंग) प्राधान्य दिले. सप्ताहात सर्वाधिक वाढ होणार्‍या समभागांमध्ये आयशर मोटर्स (6.7 टक्के), हिंडोल्को (5 टक्के), टाटा कन्झ्युमर (3 टक्के), भारती एअरटेल (2.9 टक्के), महिंद्रा अँड महिंद्रा (2.9 टक्के) याचा समावेश झाला. सर्वाधिक घट होणार्‍या समभागांमध्ये सन फार्मा (-4.3 टक्के), सिप्ला (-3.6 टक्के), टायटन (-3.6 टक्के), विप्रो (-3.0 टक्के), अदाणी मोटर्स (-2.3 टक्के) यांचा समावेश झाला.
* मार्च महिन्यात भारतातील किरकोळ महागाईदर (सीपीआय इन्फ्लेक्शन रेट) मागील 10 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजेच 4.85 टक्क्यांपर्यंत खाली आला. रिझर्व्ह बँकेने किरकोळ महागाईदर 4 ते 6 टक्क्यांपर्यंत आटोक्यात ठेवण्याचे धोरण आखले आहे. तसेच अन्नधान्य किरकोळ महागाईदर (फूडरिटेल इन्प्लेक्शन) 8.52 टक्क्यांवर आला. त्याचप्रमाणे फेब्रुवारी महिन्यात आयआयपी दर मागील चार महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर म्हणजेच 5.7 टक्क्यांवर पोहोचला. आयआयपी म्हणजे इंडेक्स ऑफ इंडस्ट्रीयल प्रॉडक्शन. हा निर्देशांक भारताच्या औद्योगिक प्रगतीच्या वाढीचे निदर्शक आहे. यावेळी सांख्यिकी विभागाला आकडेवारी जाहीर करण्यास सुमारे 40 मिनीट उशीर झाला. दर महिन्यात 12 तारखेला संध्याकाळी 5.30 वाजता आकडेवारी जाहीर करण्यात येते. परंतु, आचारसंहितेमुळे भारतीय निवडणूक आयोगाकडून सांख्यिकी विभागाला पूर्वसंमती घेणे बंधनकारक ठरले, त्यामुळे उशीर झाल्याचे म्हटले जाते.
* अनिल अंबानी समूहाला सर्वोच्च न्यायालयाचा झटका. सर्वोच्च न्यायालयाने 1000 कोटींच्या मध्यस्थता निर्णयाला (अर्बिट्रल अ‍ॅवॉर्ड) रद्दबातल ठरवले. दिल्ली मेट्रो रेल निगम (डीएमआरसी) आणि रिलायन्स इन्फ्राची उपकंपनी दिल्ली एअरपोर्ट मेट्रो एक्स्प्रेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात वाद चालू होता. यामध्ये दिल्ली मेट्रो रेल निगम ही कंपनी रिलायन्स इन्फ्राच्या उपकंपनीला कोणतेही देणे लागत नसल्याचा निर्वाळा दिला. सुप्रीम कोर्टाने दिल्ली मेट्रोला दिलासा देत तीन वर्षांपूर्वीचा आपला निर्णय याद्वारे बदलला. गतसप्ताहात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येताच बीएसई स्टॉक एक्स्चेंजवर रिलायन्स इन्फ्राचा समभाग 20 टक्के कोसळला. याचा परिणाम रिलायन्स पॉवर या अनिल अंबानी यांच्या दुसर्‍या कंपनीवरदेखील झाला. रिलायन्स पॉवर समभागदेखील 5 टक्क्यांनी घसरला.
* गत आर्थिक वर्षात डीमॅट खात्यांची संख्या 3.7 कोटींनी वाढली. एकाच वर्षात एवढी
डीमॅट खाती उघडण्याचा हा नवा विक्रम आहे. शेअर्स (समभागांची) खरेदी-विक्री करण्यासाठी डीमॅट खाते उघडणे अनिवार्य आहे. दर महिन्याला सरासरी 30 लाख नवीन डीमॅट खात्यांची भर पडून एकूण डीमॅट खात्यांची संख्या 11.45 कोटींवरून 15.14 कोटींवर पोहोचली. यामुळे स्थानिक गुंतवणूकदारांचा भारतीय शेअर बाजारावर वाढता भरोसा प्रतीत झाला.
* भारतात आयफोन निर्मितीचा कारखाना असलेली ऐगाट्रॉन नावाची कंपनी आपला प्रकल्प टाटांना विकण्यासाठी प्रयत्नशील. तैवानची ही कंपनी आपला चेन्नईमधील प्रकल्प टाटा इलेक्ट्रॉनिक्सला विकू इच्छिते. अ‍ॅपल कंपनीचीदेखील खास मान्यता असल्याचे समजते. या प्रकल्पामध्ये 10 हजार कर्मचारी असून, 50 लाख आयफोन दरवर्षी उत्पादन करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे. टाटा या कंपनीच्या प्रकल्पामधील सुमारे 65 टक्के वाटा विकत घेण्याची शक्यता आहे.
* मालदीव देशाशी तणावाचे संबंध तयार झाल्याने तोडीस तोड लक्षद्वीपमध्ये पर्यटन सुविधा देण्यासाठी भारत सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली. याचाच एक भाग म्हणून खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँकेने लक्षद्वीपच्या करावट्टी बेटावर पहिली शाखा उघडली. या बेटांवर खासगी क्षेत्रांतून बँक उघडणारी एचडीएफसी बँक ही पहिली खासगी बँक ठरली. या शाखेचे उद्घाटन भारतीय नौदलाचे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन लोकेश ठाकूर व मान्यवर डॉ. के. पी. मुथुकोया यांच्या हस्ते झाले.
* आर्थिक वर्ष 2024 मध्ये जनधन खात्यांमध्ये असलेल्या एकूण निधीमध्ये 18 टक्क्यांची वाढ होऊन एकूण निधी 2 लाख 35 हजार कोटींवर पोहोचला. मागील वर्षीच्या तुलनेत जमा निधीमध्ये तब्बल 36153 कोटींची भर पडली. सरासरी बॅलन्सदेखील 22 टक्क्यांनी वधारून 4524 कोटी रुपये झाला. फेब्रुवारी 2024 च्या तुलनेत मार्च 2024 मध्ये म्युच्युअल फंडातील इक्विटी सदरात गुंतवणुकीचा ओघ 16 टक्क्यांनी घटून 26866 कोटींवरून 22633 कोटी झाला. लार्ज कॅप, मिड कॅप व मल्टी कॅपमध्ये गुंतवणूक
(Inflow) झाली असून, स्मॉल कॅपमधील गुंतवणुकीतून बाहेर पडण्यास (Outflow) गुंतवणूकदारांनी प्राधान्य दिले. असे असले तरी एसआयपीमध्ये नवीन 42,87,117 नवीन खात्यांची नोंदणी झाली असून, एकूण एसआयपी खाते संख्या विक्रमी 8 कोटी 39 लाखांवर पोहोचली. एसआयपीच्या माध्यमातून विक्रमी 19271 कोटींची गुंतवणूक करण्यात
आली.
* युरोपचे व्याजदर ठरवणारी मध्यवर्ती बँक युरोपीयन सेंट्रल बँक (ईसीबी)ने सलग पाचव्यांदा डिपॉझिटचे व्याजदर 4 टक्क्यांवर कायम ठेवले. युरोपमधील चलनवाढ (महागाई) नियंत्रणात म्हणजेच 2 टक्क्यांवर कायम राहिल्याने नजीकच्या काळात व्याजदर कपातीची अपेक्षा/अंदाज तज्ञांनी व्यक्त केला.
* स्विगीचे संपत्ती सल्लागार (Wealth Managers) आयपीओ येण्याआधी बड्या गुंतवणूकदारांसोबत (एचएनआय) बैठका घेत आहेत. सध्याच्या बाजारमूल्यापेक्षा 20 टक्के स्वस्त दरात समभाग विकत देण्यासाठी स्विगी प्रयत्नशील आहे. 350 रुपये प्रतिसमभाग किमतीसह एकूण 80 हजार कोटी (9.6 अब्ज डॉलर्स)चे बाजारमूल्य (Market Valuation) विक्रीसाठी लावण्यात येत आहे. इन्व्हेस्को या आर्थिक वित्त संस्थेच्या मतानुसार स्विगीचे बाजारमूल्य सध्या 12.7 अब्ज डॉलर्स असून, सुमारे 1 अब्ज डॉलर्सचा (सुमारे 8.5 हजार कोटींचा) आयपीओ बाजारात येऊ शकतो.
* आयटी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी टीसीएसचा गत आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचा एकूण नफा 12.4 टक्क्यांनी वधारून 12434 कोटी झाला. कंपनीचा महसूल 1.1 टक्क्यांनी वधारून 61237 कोटी झाला. कंपनीची ऑपरेटिंग मार्जिन मागील तिमाहीच्या तुलनेत 23.4 टक्क्यांवरून 26 टक्क्यांवर पोहोचली. कंपनीने 28 रुपयांचा लाभांशदेखील जाहीर केला. मागील 2 दशकात कंपनीची कर्मचारी संख्या प्रथमच 13249 ने घटून 601546 वर खाली आली.
* 18 हजार कोटींच्या एफपीओसाठी व्होडाफोन-आयडिया कंपनीने 10 ते 11 रुपयांचा किंमतपट्टा ठरवला. यातील 5720 कोटी कंपनीच्या 5 जी सुविधा सुरू करण्यासाठी वापरण्यात येणार. 3370 कोटी नवीन 4 जी तंत्रज्ञानावर आधारित 26 हजार नव्या जागांवर सुविधा सुरू करण्यासाठी उपकरण खरेदीसाठी वापरण्यात येणार तसेच 2175 कोटी थकीत सरकारी करभरणा करण्यासाठी वापरण्यात येणार.
Latest Marathi News अर्थवार्ता Brought to You By : Bharat Live News Media.