
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : यंदाच्या हंगामातील सर्वात उष्ण दिवस असे 14 एप्रिलच्या रविवारची नोंद करता येईल. इतका भयंकर उकाडा शहरात जाणवत होता. शिवाजीनगर 40, कोरेगाव पार्क, चिंचवड 41, तर लवळे भागाचा पारा 42 अंशांवर गेल्याने यंदाच्या हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली आहे. संपूर्ण मार्च महिना यंदा पुणेकरांना जड गेला. कारण संपूर्ण महिन्यात उष्णतेची लाट तीव्र होती.
एप्रिल महिन्यात तर पाऱ्याने चाळीशी गाठली अन् ढगाळ वातावरणामुळे उष्मा अधिक जाणवत आहे. उष्णता कोंडीत सापडल्याने रात्रीच्या तापमानात 9 ते 10 वर्षांनी यंदा वाढ झाल्याने दिवसभर आणि रात्रीही नागरिकांची झोप उडाली आहे. रविवारी 14 एप्रिल रोजी शहरातील ढग कमी झाल्याने प्रचंड उकाडा निर्माण झाला होता. त्यामुळे दुपारी 1 ते 4 पर्यंत शहरात गर्दी कमी झाली होती. सायंकाळी 6 नंतर शहरात वर्दळ सुरू झाली होती. सायंकाळीही प्रचंड उकाडा जाणवत होता.
किमान तापमानात पुणे राज्यात आघाडीवर
ढगाळ वातावरण होताच शहराच्या किमान तापमानात मोठी घट झाली आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वी शहराचे किमान तापमान 26 ते 27.9 अंशांवर गेले होते. मात्र, त्यात मोठी घट होऊन ते पुन्हा 18.1 अंशांवर खाली आले आहे. रविवारी पुणे शहराचे किमान तापमान राज्यात सर्वांत कमी ठरले.
रविवारचे कमाल-किमान तापमान
लवळे 42 ( 20.5), शिवाजीनगर 40(18.9), पाषाण 40(19.3), लोहगाव 40(20.8), चिंचवड 41(22.1), मगरपट्टा 39(23.8), एनडीए 40(16.8)
हेही वाचा
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय गृहकलहाला उधाण!
सरकारमधील नेत्यांचा गुन्हेगारीला आशीर्वाद : खासदार सुप्रिया सुळे
सरकारमधील नेत्यांचा गुन्हेगारीला आशीर्वाद : खासदार सुप्रिया सुळे
Latest Marathi News Weather Update : शहराला ‘रविवार’चा सर्वाधिक ताप! चिंचवडचा पारा 41 वर Brought to You By : Bharat Live News Media.
