अमरनाथ यात्रा 29 जूनपासून

जम्मू ः  लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले असताना अमरनाथ यात्रेबाबतची मोठी माहिती समोर आली आहे. यंदा अमरनाथ यात्रेची सुरुवात 29 जूनपासून होणार आहे. ही यात्रा रक्षाबंधन म्हणजे 19 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. निवडणुकीनंतर प्रशासनाचे सर्व लक्ष या यात्रेवर केंद्रित होईल. याबाबतची माहिती अमरनाथ श्राइन बोर्डाने दिली आहे. 15 एप्रिलपासून भाविकांना नोंदणी करता येईल. यावेळची यात्रा 40 दिवस … The post अमरनाथ यात्रा 29 जूनपासून appeared first on पुढारी.

अमरनाथ यात्रा 29 जूनपासून

जम्मू ः  लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले असताना अमरनाथ यात्रेबाबतची मोठी माहिती समोर आली आहे. यंदा अमरनाथ यात्रेची सुरुवात 29 जूनपासून होणार आहे. ही यात्रा रक्षाबंधन म्हणजे 19 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. निवडणुकीनंतर प्रशासनाचे सर्व लक्ष या यात्रेवर केंद्रित होईल. याबाबतची माहिती अमरनाथ श्राइन बोर्डाने दिली आहे.
15 एप्रिलपासून भाविकांना नोंदणी करता येईल. यावेळची यात्रा 40 दिवस सुरू राहणार आहे. जेकेएसएएसबी डॉट एनआयसी डॉट इन या बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर भाविक नोंदणी करू शकतील. तसेच मोबाईल अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातूनही भाविक आपली नोंदणी करू शकतात. यात्रा सुरू झाल्यानंतर पवित्र गुंफातून रोज सकाळी आणि सायंकाळी आरतीचे थेट प्रसारण केले जाणार आहे.
Latest Marathi News अमरनाथ यात्रा 29 जूनपासून Brought to You By : Bharat Live News Media.