पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीकडून विविध पदांसाठी मोठी भरती केली जाणार आहे. या भरतीअंतर्गत तब्बल 109 पदांसाठी रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 3 मेपर्यंत अर्ज भरावे लागणार आहेत. 3 मे ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
त्यासाठी उमेदवारांना https:/// upsc. gov. in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज भरावे लागणार आहेत. या भरती प्रक्रियेत विविध एकूण 109 पदे असून, यूपीएससीअंतर्गत ही प्रक्रिया पार पडणार आहे. वैज्ञानिक-बी (नॉनडिस्ट्रक्टिव्ह), सहायक प्राध्यापक (नेफ्रोलॉजी), सहायक प्राध्यापक (न्यूक्लिअर मेडिसीन), सहायक प्राध्यापक (ऑर्थोपेडिक्स), सहायक प्राध्यापक (बालरोग हृदयविज्ञान), सहायक प्राध्यापक (बालरोग शस्त्रक्रिया), सहायक प्राध्यापक (प्लास्टिक आणि पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया), सहायक प्राध्यापक (सर्जिकल ऑन्कोलॉजी), सहायक प्राध्यापक (युरोलॉजी), संशोधन अधिकारी (रसायनशास्त्र), वैज्ञानिक-बी (रसायनशास्त्र), वैज्ञानिक-बी (भौतिक शास्त्र), अन्वेषक ग्रेड-ख, सहायक रसायनशास्त्रज्ञ, उपमहासंचालक (तांत्रिक), सहायक प्राध्यापक (बीबीए), सहायक प्राध्यापक (वाणिज्य सामान्य), सहायक प्राध्यापक (कॉर्पोरेट सचिवपद), सहायक प्राध्यापक (अर्थशास्त्र), सहायक प्राध्यापक (इंग्रजी), सहायक प्राध्यापक (हिंदी), सहायक प्राध्यापक (संगीत), सहायक प्राध्यापक (मानसशास्त्र), सहायक प्राध्यापक (समाजशास्त्र), वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेद) ही पदे भरली जाणार आहेत.
अर्ज कसा करावा?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठी यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी आणि नोंदणी करावी. सर्व माहिती भरल्यानंतर परीक्षा शुल्क भरून प्रिंट काढता येणार आहे.
हेही वाचा
कोल्हापूर : मंडलिक व माने हेच उमेदवार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विजयसिंह मोहिते-पाटील यांचा प्रवेश राष्ट्रवादीच्या फायद्याचाच : शरद पवार
..आणि शंभर वर्षांपूर्वीचा वृक्ष कोसळला; रेल्वे स्टेशन परिसरात अनर्थ टळला
Latest Marathi News यूपीएससीमार्फत भरली जाणार ‘ही’ रिक्त पदे : असा करा अर्ज! Brought to You By : Bharat Live News Media.