अभिनेता रणदीप हुड्डा अडकणार लग्न बंधनात
पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा याने त्याच्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे. रणदीप हुड्डा 47 व्या वर्षी लग्न करणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्नाची पत्रिका शेअर करत त्याने ही माहिती दिली. रणदीपने लिहिले की, तो त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री लिन लैश्रामसोबत मणिपूरमधील इम्फाळमध्ये विवाह बंधनात अडकणार आहे. लिन आणि रणदीप गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत; पण त्यांनी कधीच त्यांच्या नात्याबद्दल मीडियात चर्चा केली नव्हती. (Randeep Hooda Wedding)
रणदीप हुड्डाने केली लग्नाची घोषणा
रणदीपने इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली. रणदीप हुड्डा आणि लिन लैश्राम२९ नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. रणदीपच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत. (Randeep Hooda Wedding) रणदीप अनेक वर्षांपासून लिनला डेट करत आहे. दोघेही अनेकदा एकमेकांसोबत स्पॉट झाले आहेत. रणदीप हुड्डा आणि लिन लैश्राम यांच्या वयात १० वर्षांचा फरक आहे. एकीकडे रणदीप ४७ वर्षांचा आहे तर लिन ३७ वर्षांची आहे.
मुंबईत होणार रिसेप्शन
‘हिंदुस्तान टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, रणदीप हुड्डा त्याच्या लग्नात कुटुंबीयांसह जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. या लग्नाची थीम पौराणिक कथांवर आधारित आहे. लग्नानंतर हे जोडपे मुंबईत भव्य रिसेप्शन पार्टीचे आयोजन करणार आहेत, ज्यामध्ये बॉलिवूडचे सर्व सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.
View this post on Instagram
A post shared by Randeep Hooda (@randeephooda)
हेही वाचा :
छ.संभाजीनगर : अज्ञात वाहनाच्या धडकेत शिवणावाडीतील दुचाकीस्वार जागीच ठार
कोल्हापूर : श्रद्धा पाटीलची राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
डोंबिवली : ‘धक्कादायक’, हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात साप आढळला साप
The post अभिनेता रणदीप हुड्डा अडकणार लग्न बंधनात appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा याने त्याच्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे. रणदीप हुड्डा 47 व्या वर्षी लग्न करणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्नाची पत्रिका शेअर करत त्याने ही माहिती दिली. रणदीपने लिहिले की, तो त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री लिन लैश्रामसोबत मणिपूरमधील इम्फाळमध्ये विवाह बंधनात अडकणार आहे. लिन आणि रणदीप गेल्या काही वर्षांपासून …
The post अभिनेता रणदीप हुड्डा अडकणार लग्न बंधनात appeared first on पुढारी.