जूनमध्ये आंतरराष्ट्रीय ‘शौर्यथॉन’

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सरहद पुणे आणि भारतीय लष्कर यांच्या संयुक्त विद्यमाने व अर्हम संस्था पुणेच्या सहकार्याने सरहद शौर्यथॉन या आंतरराष्ट्रीय कारगिल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सरहद संस्थेचे संजय नहार यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही शौर्यथॉन रविवार, दि. 30 जून रोजी लडाख येथे झोजिला वॉर मेमोरियल ते कारगिल वॉर मेमोरियल, … The post जूनमध्ये आंतरराष्ट्रीय ‘शौर्यथॉन’ appeared first on पुढारी.
जूनमध्ये आंतरराष्ट्रीय ‘शौर्यथॉन’

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : सरहद पुणे आणि भारतीय लष्कर यांच्या संयुक्त विद्यमाने व अर्हम संस्था पुणेच्या सहकार्याने सरहद शौर्यथॉन या आंतरराष्ट्रीय कारगिल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सरहद संस्थेचे संजय नहार यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही शौर्यथॉन रविवार, दि. 30 जून रोजी लडाख येथे झोजिला वॉर मेमोरियल ते कारगिल वॉर मेमोरियल, द्रास या दरम्यान होणार आहे. ही मॅरेथॉन झोजिला युद्ध विजय अमृत महोत्सव आणि कारगिल युद्ध विजय रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आली असून, या मॅरेथॉनमध्ये दोन हजार धावपटू भाग घेणार आहेत.
या स्पर्धेत पुरुष आणि महिलांसाठी 44 कि.मी. झोजिला वॉर व्हिक्टरी मॅरेथॉन, 25 कि.मी. कारगिल व्हिक्टरी रन, 10 कि.मी. आणि 7.5 कि.मी. टायगर हिल व्हिक्टरी रन या अंतराच्या स्पर्धा तसेच पुरुष, महिला आणि शालेय व महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी 4 कि.मी. अंतराच्या ‘फिटनेस रन’चे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना चार लाख रुपयांची रोख पारितोषिके संयोजन समितीतर्फे देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स आणि अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्या नियमानुसार होतील. हिमालयातील पर्वत रांगांमधून जाणार्‍या आणि अतिशय आव्हानात्मक असणार्‍या या स्पर्धा मार्गावर नियमानुसार, तांत्रिक अधिकारी, रिफ्रेशमेंट बूथ, पिण्याच्या पाण्याचे बूथ, वैद्यकीय व्यवस्था, अद्ययावत रुग्णवाहिका, मार्गदर्शक कि.मी. अंतराचे बोर्डस्, मोटारसायकल पायलटस्, संपूर्ण स्पर्धा मार्गावर लडाख ट्रॅफिक पोलिसांचे नियंत्रण आणि बंदोबस्त तसेच भारतीय लष्कराचे बिनतारी संदेश नियंत्रण व्यवस्था करण्यात येणार आहे.
या समितीत सरहद संस्थेचे संजय नहार यांच्यासह अर्हम संस्थेचे डॉ. शैलेश पगारीया तसेच स्पर्धा संचालक सुमंत वाईकर, तर तांत्रिक संचालक वसंत गोखले हे आहेत. तसेच ‘13 वी बटालियन जम्मू काश्मीर रायफल्स’चे कर्नल अभिषेक सिंग चरक (कमांडिंग ऑफिसर) व ले. कर्नल संदीप सिंग दुल्लत आणि युवराज शहा, पुणे आणि अनुज नहार, ट्रस्टी सरहद, पुणे हे समिती सदस्य आहेत. हिमालयातील लडाख या केंद्रशासित प्रदेशात कारगिलमध्ये होणार्‍या सरहद आणि भारतीय लष्कराच्या या ऐतिहासिक मॅरेथॉन स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून एका राज्याचे राज्यपाल आणि वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा

उत्तर प्रदेशात मोदी-योगी यांचाच डंका!
गरिबांना आणखी पाच वर्षे मोफत रेशन : भाजपचा जाहीरनामा
MI vs CSK : चेन्नईचा सुपर विजय; होमग्राऊंडवर मुंबई इंडियन्स पराभूत

Latest Marathi News जूनमध्ये आंतरराष्ट्रीय ‘शौर्यथॉन’ Brought to You By : Bharat Live News Media.