चंद्रपूर : ‘त्या’ व्हायरल पत्रावर तेली समाज संघटनांचा आक्षेप

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : दोन दिवसांपूर्वी चंद्रपुरातील मातोश्री सभागृहात तेली समाज संघटनांची बैठक पार पाडली. याच बैठकीत इंडिया आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणा करण्यात आली. यानंतर काँग्रेस उमेदवारांना तेली समाज संघटनांचा पाठिंबा देत असल्याचे पत्र समाज माध्यमावर व्हायरल झाले. मात्र, या व्हायरल पत्रावर काही तेली समाज संघटनांनी आक्षेप घेतला आहे. या पत्रावरील काही स्वाक्षरी या … The post चंद्रपूर : ‘त्या’ व्हायरल पत्रावर तेली समाज संघटनांचा आक्षेप appeared first on पुढारी.
चंद्रपूर : ‘त्या’ व्हायरल पत्रावर तेली समाज संघटनांचा आक्षेप

चंद्रपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : दोन दिवसांपूर्वी चंद्रपुरातील मातोश्री सभागृहात तेली समाज संघटनांची बैठक पार पाडली. याच बैठकीत इंडिया आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणा करण्यात आली. यानंतर काँग्रेस उमेदवारांना तेली समाज संघटनांचा पाठिंबा देत असल्याचे पत्र समाज माध्यमावर व्हायरल झाले. मात्र, या व्हायरल पत्रावर काही तेली समाज संघटनांनी आक्षेप घेतला आहे. या पत्रावरील काही स्वाक्षरी या बनावट आहेत. केवळ समाजाची दिशाभूल करण्याचा या पत्रातून झाल्याचा आरोप प्रांतिक तेली समाज संघटना तथा भाजपाचे नेते प्रकाश देवतळे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.
देवतळे म्हणाले, दोन दिवसांपूर्वी तेली समाज चंद्रपूर या संघटनेच्या नेतृत्वात मातोश्री सभागृहात विविध तेली समाजसंघटनेची चिंतन बैठक आणि मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तशी निमंत्रण पत्रिका काढण्यात आली. या बैठकीत राजकीय पक्षाला पाठिंबा देण्याबाबतचा कोणताही विषय नव्हता. मात्र, समाजसंघटनेची बैठक सुरू असताना तेथे काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर आणि आमदार सुभाष धोटे यांची एन्ट्री झाली. आयोजकांनी तेली समाजाचा पाठिंबा इंडिया आघाडीला जाहीर केला,त्यामुळे विविध समाजसंघटेचे प्रतिनिधी संभ्रमात पडले. अनेकांनी तेव्हाच याबैठकीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र, काही संघटनेच्या नेत्यांनी संपूर्ण तेली समाजाला गृहित धरून विविध समाजसंघटनांचा इंडिया आघाडीला पाठिंबा असल्याचे पत्र विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना दिले.हे पत्र खोटे असून तेली समाजाने अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा दिला नाही.हे पत्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर विविध संघटनांनी या व्हायरल पत्राबाबत निषेध व्यक्त केला आहे. या पत्रात तब्बल 12 संघटनांची नावे आहेत. मात्र, यातील बहुतांश संघटनांनी या पत्राशी आणि पत्रावर असलेल्या नावाशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. पत्रावरील अनेक स्वाक्षरी या बनावट आहेत. काही संघटनांना विश्वासात न घेता त्यांची नावे टाकण्यात आली आहेत, अशी माहिती प्रकाश देवतळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी तेली समाजाचे नेते आशिष देवतळे, माजी नगरसेविका छबू वैरागडे, ज्योती भुते, गणेश बानकर, घनश्याम डुकरे, बाळू पिसे, दर्शन बेले, उमेश आष्टनकर उपस्थित होते.
Latest Marathi News चंद्रपूर : ‘त्या’ व्हायरल पत्रावर तेली समाज संघटनांचा आक्षेप Brought to You By : Bharat Live News Media.